'भारत महासत्ता होतोय आणि आपण भीक मागतोय...', पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या नेत्याने भर संसदेत व्यक्त केली मनातील खदखद

| Published : Apr 30 2024, 08:33 AM IST / Updated: Apr 30 2024, 08:36 AM IST

Maulana Fazlur Rehman Viral Video over India vs Pakistan

सार

Pakistan : पाकिस्तानच्या संसदेत भारताचे कौतुक करण्यात आले. जमीयम उलेमा इस्लाम पाकिस्तानचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानातील स्थिती सांगताना भारताचे गोडवे गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pakistan News : पाकिस्तानातील राजकीय नेतेमंडळी भारताचा कितीही द्वेष करत असले तरीही आज ते मानतायत की, भारत आपल्या पुढे गेलाय. अशातच एक कट्टर भारत विरोधी पाकिस्तानी मौलाना आणि राजकीय नेत्याने भर संसदेत भारताचे गोडवे गायले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मौलाना डीजल नावाने प्रसिद्ध असलेले पाकिस्तानातील खासदार आणि जमीयत उलेमा-इस्लाम पाकिस्तानचे (Jamiat Ulema-e-Islam Pakistan) अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) यांनी भारताबद्दच्या भावना भर संसेद व्यक्त केल्या आहेत. मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले की, "भारत आज महासत्ता होण्याची तयारी करतोय आणि पाकिस्तान जगातील देशांसमोर आर्थिक मदतीसाठी हात पसरवत आहे."

मौलाना फजलुर रहमान यांनी नक्की काय म्हटलेय?
पाकिस्तानातील सध्याची स्थिती सांगत मौलाना फजलुर रहमान यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना केली. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले की, "आपण आपल्या मर्जीने कायदे तयार करू शकत नाही. या संसदेवर आपण सर्व करतो की, यामुळे आपण वीवीआयपी झालो आहोत. भारत आणि पाकिस्तानला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. आज भारत जगात महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय आणि पाकिस्तान दिवाळखोरीपासून बचाव करण्यासाठी भीक मागतोय. यासाठी कोण जबाबदार आहे? सर्व गोष्टी फिरून राजकीय नेत्यांवरच येतात."

पाकिस्तानातील सैन्यावर जोरदार टीका
मौलाना फजलुर रहमान यांनी संसदेत बोलताना पुढे म्हटले की, पाकिस्तानच्या सैन्यानेच देशाची वाट लावली आहे. सैन्याकडून आम्हाला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते आणि तेच निर्णय घेतात. परिणामी राजकीय नेत्यांना कलंक लावला जातो. देशातील सर्वसामान्य नागरिक आम्हला शिव्या देतात. आम्हाला जबाबदार ठरवतात. हे कोणते राजकरण सुरूय आणि देशाला कुठे आणले आहे असाही सवाल मौलाना फजलुर रहमान संसदेत उपस्थितीत केला. 

पाकिस्तानवर असलेल्या कर्जावरही बोलले
मौलाना फजलुर रहमान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेल्या कर्जाचाही संसदेतील भाषणात उल्लेख केला. आयएमएफने (IMF) दुसरा आणि अखेरच्या टप्प्यातील हप्ता याच महिन्यात मान्य केला होता. यानंतर पुन्हा पाकिस्तानने कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरले. फजलुर रहमान यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडीओ पाकिस्तानातील पत्रकार गुलाब अब्बास शाह यांनी शेअर केला आहे. दरम्यान, व्हिडीओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे नाते मोडले! पाकिस्तानातील इस्लामिक मौलवीने केलेल्या विधानाचा पाहा Viral Video

पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या पालघरमधील मच्छिमाराचा मृत्यू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर