सार

Viral Video : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पाकिस्तानातील एका इस्लामिक मौलवीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे रिलेशनशिप मोडल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Viral Video : देशात लोकसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक इस्लामिक मौलवी त्याच्या नात्याबद्दल सांगताना दिसून येत आहे. याशिवाय मोदी सरकार आल्यामुळे नाते मोडल्याचा दावाही व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते की, इस्लामिक मौलवी आपले नाते मोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला जबाबदार धरत आहे. याशिवाय भारतातील तरुणीशी लग्न ठरले तो. पण मोदी सरकार आल्यानंतर व्हिसाची समस्या कशी सोडवणार याचा प्रश्न उपस्थितीत झाला. यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा नात्याबद्दल विचार करू. पण निवडणुकीनंतरही पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले. अशातच नाते मोडले गेले आणि लग्नही झाले नाही. आता तिसऱ्या निवडणुकीत काय होते हे पाहूया? असेही मौलवीने म्हटले आहे. 

सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युजर्सने पाहिले आहे. दरम्यान, एशियानेट न्यूज मराठी व्हिडीओची पुष्टी करत नाही.

आणखी वाचा : 

तुम्हाला आई बहिणी नाहीत का? रशियन महिलेने पाकिस्तानी पुरुषांबद्दल सांगितली अशी गोष्ट की...

Schengen Visa : भारतीयांना युरोपातील 29 देशांत फिरणे होणार सोपे, युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल