पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या पालघरमधील मच्छिमाराचा मृत्यू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

| Published : Apr 27 2024, 11:30 AM IST / Updated: Apr 27 2024, 11:32 AM IST

death 01

सार

Pakistan : पाकिस्ताच्या तुरुंगात बंद असणाऱ्या पालघरमधील मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. सदर मृत मच्छिमाराचा मृतदेह 29 एप्रिलला भारतात आणला जाणार आहे.

Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असणाऱ्या महाराष्ट्रातील मच्छिमाराचा 17 मार्चला मृत्यू झाला. विनोद लक्ष्मण कोल (Vinod Kol) असे मृत मच्छिमाराचे नाव असून तो पालघर (Palghar) येथे राहणारा होता. रिपोर्ट्सनुसार, 29 एप्रिलला लक्ष्मणचा मृतदेह त्याच्या गावी आणला जाणार आहे. 

खरंतर, विनोद गुजरातमधील रजिस्टर्ड मच्छिमार बोटीवर काम करायचा. घटना वर्ष 2022 मधील आहे. विनोद मासे पकडण्यासाठी गेला असता त्याने पाकिस्तानची समुद्र सीमा ओलांडल्याने ताब्यात घेण्यात आले होते.

मच्छिमाराचा पाकिस्तानातील तुरुंगात मृत्यू
रिपोर्ट्सनुसार, 8 मार्चला आंघोळ करताना विनोदला अर्धांगवायूचा झटका (Paralysis Attack) आल्याने खाली कोसळला. यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातमधील रुग्णालयात लक्ष्मणवर उपचार सुरू होते. तुरुंगात बंद असणाऱ्या अन्य भारतीय कैद्यांना विनोदच्या मृत्यूबद्दल 17 मार्चला सांगण्यात आले. भारतातील कैद्यांच्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या मतदीने विनोदच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. कुटुंबातील मंडळींना विनोदच्या मृत्यूची बातमी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आलीय.

कुटुंबातील व्यक्तींनी साधला स्थानिक आमदाराशी संपर्क
विनोदच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घरी आणला जाणार नाही असे बोलले जात होते. यामुळेच कुटुंबातील व्यक्तींनी स्थानिक आमदाराशी संपर्क साधला. हाच मुद्दा आमदाराने केंद्र सरकारसमोर उपस्थितीत केला असता पाकिस्तानातील अधिकाऱ्यांची विनोदच्या मृत्यूबद्दल संवाद साधण्यात आला. यानंतर आता विनोदचा मृतदेह पाकिस्तानातून भारतात आणला जाणार आहे.

आणखी वाचा : 

Google च्या 20 वर्षांच्या इतिहासात वारसा कराबाबत करण्यात आले सर्वाधिक सर्च, सॅम पित्रोदाही ट्रेण्डमध्ये

संतापजनक! पाकिस्तानात हिंदू धर्माच्या भावनांसोबत खेळ, हनुमानाच्या मंदिराला बनवले शौचालय (Watch Viral Video)