सार

पापुआ न्यू गिनी या देशात मोठा अपघात झाला असून 2,000 पेक्षा जास्त लोक भूस्खलनात गाडले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे अजूनही भूस्खलन होत असल्यामुळे बचावकार्य पोहचायला अडचणी येत आहेत. 

पापुआ न्यू गिनी देशात  मोठा अपघात झाला असून भूस्खलनात 2,000 पेक्षा जास्त लोक गाडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व लोक जिवंत गाडले गेले असून त्यामुळे त्या सगळ्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी पहाटे माउंट मुंगलोचा एक भाग कोसळला तेव्हा अनेक लोक घरामध्ये झोपलेले अवस्थेत होते, त्यांना आपल्याला काय होत आहे याची यावेळी जाणीव झाली नाही. 

भूस्खलनामुळे जीवितहानीसोबतच झाली मोठी वित्तहानी - 
येथे झालेल्या भूस्खलनामुळे जीवितहानीसोबतच वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. इमारती आणि बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही मोठा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे अजूनही भूस्खलन होत असल्यामुळे बचावलेल्या लोकांना आणि बचाव पथकाला अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आपत्ती झाल्यानंतर येथे बचावपथके रावण करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून येथे बचावाची कामे चालली असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे आपत्ती केंद्रातून कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे, याची चौकशी केली जात आहे. येथून मदतीचा समन्वय साधला जावा आणि लोकांपर्यंत मदत पोहचवली जावी असेही सांगण्यात आले आहे. 
आणखी वाचा - 
SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81%, दहावीप्रमाणेच बारावीतही कोकण विभाग अव्वल
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून करण्यात आला गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण