सार

रशियाची राजधानी मॉस्को येथील एका कॉन्स्टर्ट हॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Moscow Firing : रशियाची राजधानी मॉस्को येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यामध्ये 60 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून 100 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. रशियाच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्को जवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये कॉन्सर्ट सुरू असताना दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला.

कॉन्सर्ट हॉलमध्ये करण्यात आलेल्या गोळीबाराच्या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (Islamic State) घेतली आहे. या संबंधित पोस्टही इस्लामिक संघटनेने केली आहे.

नक्की काय घडले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन ते चार जणांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार सुरू केला. यामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या पथकाने नागरिकांना कॉन्सर्ट हॉलमधून सुरक्षित बाहेर काढण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. आपत्कालीन सेवा मंत्रालयाने या घटनेसंबंधित म्हटले की, दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर जवळजवळ 100 जणांनी हॉलमधून पळ काढला. अन्यकाही जण हॉलच्या छतावर जाऊन लपले.

हल्ल्यासाठी दहशतवाद्यांकडून स्फोटकांचा वापर
रशियाच्या मीडियानुसार, दहशतवाद्यांनी स्फोटकांचा वापर केल्याने हॉलमध्ये स्फोट होत भीषण आग लागली. सोशल मीडियावर घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हॉलमधून आगीचे लोट बाहेर पडताना दिसून येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दहतदवाद्यांनी शेकडो जणांना बांधूनही ठेवले आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली प्रतिक्रिया
रशियाने कॉन्सर्ट हॉलमध्ये करण्यात आलेल्या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवा यांनी घटनेबद्दल म्हटले की, हा एक दहशतवादी हल्ला आहे. याशिवाय मॉस्कोच्या महापौरांनीही मृत नागरिकांच्या परिवाराप्रति दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय रशियाच्या एजेंसीकडून विमानतळ, रेल्वे स्थानकावरील सुरक्षितता अधिक वाढवण्यात आली आहे.

सुरक्षा बलाच्या पोषाखात घुसले बंदूकधारी
रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा बलाच्या वर्दीमध्ये कमीत कमी तीन बंदूकधारी कॉन्सर्ट हॉलमध्ये पोहोचले. यानंतर त्यापैकी एकाने हॉलमध्ये गोळीबार सुरू केला. यामध्ये काही जणांचा मृत्यू होण्यासह जखमीही झाले. रशियाच्या वृत्त संस्थेने म्हटले की, हल्ल्यानंतर इमारतीला भीषण आग देखील लागली.

आणखी वाचा : 

मुलाने आपल्या 72 वर्षांच्या वडिलांसोबत या देशाच्या PM पंगा घेतला, डीपफेकद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण...

US Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा ओहायोमध्ये प्राथमिक निवडणुकीत विजय

अमेरिकेच्या H-1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठी 22 मार्चपर्यंत मूदत, ऑनलाइन अर्जासाठी ही कागदपत्रे सादर करावी लागणार