सार

Viral Video : सोशल मीडियावर पाकिस्तानातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हनुमानाच्या मंदिराला चक्क शौचालयाचे रूप दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Viral Video : पाकिस्तानातील लाहौर येथील बासुली हनुमान मंदिर (Basuli Hanuman Temple) जे ‘बन्सी मंदिर’ नावानेही ओखळले जाते. या मंदिराची स्थापना 20 व्या शतकात एका हिंदू परिवाराने केली होती. या मंदिराला एकेकाळी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण मानले जायचे. पण कालांतराने हनुमान मंदिराकडे दुर्लक्ष झाले आणि आताची मंदिराची स्थिती पाहून प्रत्येकाला धक्का बसेल. सोशल मीडियात बासुली हनुमान मंदिराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसतेय की, मंदिराच्या परिसराच्या आतमध्ये सहा शौचालय उभारण्यात आले आहेत. अशाप्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जातोय. व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर पाकिस्तान अनटोल्ड अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामुळे एशियानेट न्यूज मराठी व्हिडीओची पुष्टी करत नाही.

हनुमान मंदिराचे पालटलेले रूप पाहून नेटकरी संतप्त
जगभरातील हिंदूंनी बासुली हनुमान मंदिराचा व्हिडीओ पाहला असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्यांसमोर किती मोठी आव्हाने असतील असे काहींनी म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानाच्या सीमेपलीकडील बासुली हनुमान मंदिराची झालेली अवस्था पाहून धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांच्या अधिकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आणखी वाचा : 

अमेरिकेत मृत्यूनंतर सरकारच्या खात्यात जाते 50 टक्के संपत्ती, पण भारतात..., सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानामुळे राजकरण तापले

मालदीवमध्ये मोइज्जू विजयाच्या अगदी जवळ, पक्षाने संसदेच्या निवडणुकीत जिंकल्या सर्वाधिक जागा, भारतासोबत संबंध बिघडणार?