Google च्या 20 वर्षांच्या इतिहासात वारसा कराबाबत करण्यात आले सर्वाधिक सर्च, सॅम पित्रोदाही ट्रेण्डमध्ये

| Published : Apr 25 2024, 03:48 PM IST / Updated: Apr 25 2024, 03:54 PM IST

Sam pitroda

सार

Google Search : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदांनी नुकत्याच अमेरिकेतील वारसा कराबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अशातच बहुतांशजणांनी गुगलवर वारसा कर म्हणजे नक्की काय हे सर्वाधिक सर्च केले आहे. 

Google Search :  वारसा कराबाबत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी मोठे विधान केले होते. सॅम पित्रोदांनी म्हटले होते की, “अमेरिकेत जर एखाद्याकडे 100 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे आणि त्याचे निधन झाल्यास त्या व्यक्तीची संपूर्ण संपत्ती मुलांना मिळत नाही. संपत्तीमधील अर्धा हिस्सा सरकारच्या खात्यात जातो. उर्वरित हिस्सा मुलांना मिळतो.” असा अमेरिकेतील वारसा कर असल्याचे म्हटले होते. अशातच वारसा कर म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. पण गुगल सर्चवर वारसा करासह सॅम पित्रोदांनाही सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

गुगल सर्चवर वारसा कर आणि सॅम पित्रोदा सर्वाधिक वेळा सर्च
सॅम पित्रोदांनी अमेरिकेतील वारसा कराबद्दल भारतासाठी जे विधान केले त्यानंतर वारसा कर नक्की काय आहे हे नेटकऱ्यांनी सर्वाधिक वेळा सर्च केल्याचे दिसून आले आहे. खरंतर गुगलवर गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात आता वारसा कराबद्दल सर्वाधिक सर्च केले आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांमध्ये सॅम पित्रोदांनाही सर्वाधिक वेळा सर्च केले आहे.

वारसा कर नक्की काय आहे?
वारसा कर म्हणजे असा कर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या उत्ताराधिकारी किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या संपत्तीवर लावला जातो. या कराचे मूल्यांकन सर्वसामान्यपणे कोणत्याही देशातील राज्य किंवा फेडरल स्तरावर केले जाते. हा कर मृत व्यक्ती कुठे राहत होता आणि त्याची संपत्ती कुठे आहे अशा काही अधिकार क्षेत्राच्या कायद्यांवर देखील अवलंबून असते. (Warsa kar manje kay?)

भारतात वारसा कर लागू आहे का?
भारतात कोणताही वारसा कर लागू नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती त्याच्या वारसदाराला मिळते. यावर कोणताही कर लावला जात नाही.

कोण आहेत सॅम पित्रोदा?
सॅम पित्रोदा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा असे आहे. पित्रोदा वर्ष 1964 मध्ये अमेरिकेत निघून गेले आणि तेथेच स्थायिक झाले. वर्ष 1981 मध्ये भारतात परतले आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काम करण्यास पित्रोदांनी सुरूवात केली होती. त्यावेळी भारताचे नागरिकत्वही स्विकारले होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर सॅम पित्रोदा यांनी राजीव गांधी यांच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली. राजीव गांधींचे ते सल्लागार झाले आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू केला. घरोघरी कंप्युटर आणि मोबाइल फोन पोहोचवण्यासाठी सॅम पित्रोदांनी मोठी भूमिका बजावली होती. (Kon ahet Sam Pitroda?)

याशिवाय सॅम पित्रोदा काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. सॅम पित्रोदा फार कमी बोलतात. पण सॅम पित्रोदा ज्यावेळी बोलतात तेव्हा पक्षाला वादाच्या भोवऱ्यात अडकवतात. आताही अमेरिकेतील वारसा कराच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात अडकले गेले आहेत. यावर आता पक्षाला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

आणखी वाचा : 

अमेरिकेत मृत्यूनंतर सरकारच्या खात्यात जाते 50 टक्के संपत्ती, पण भारतात..., सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानामुळे राजकरण तापले

सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला, म्हणाले- पालकांकडून मिळणाऱ्या मालमत्तेवरही काँग्रेस लावणार कर