'हातात तलवार...भारताविरोधात घोषणा', खलिस्तान्यांकडून कॅनडा दौऱ्यावर आलेल्या भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध

| Published : Mar 18 2024, 11:05 AM IST / Updated: Mar 18 2024, 11:09 AM IST

Khalistani in Canada
'हातात तलवार...भारताविरोधात घोषणा', खलिस्तान्यांकडून कॅनडा दौऱ्यावर आलेल्या भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

कॅनडा येथे खलिस्तान्यांकडून भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. याशिवाय खलिस्तान्यांनी हातात तलवार घेण्यासह भारताविरोधात घोषणाही दिल्या.

Canada : कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हिंसेची बाब आता सामान्य झाली आहे. येथील खलिस्तानी समर्थक भारतातील नागरिकांना त्रास देतात, त्यांना मारहाण करतात. अशातच आता भारताच्या उच्चायुक्तांना देखील खलिस्तान्यांनी सोडलेले नाही. खरंतर, घटना कॅनडातील अलबर्टा (Alberta) येथील असून भारताच्या उच्चायुक्तांच्या कॅनडातील स्वागतामुळे खलिस्तानी संतप्त झाले.स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने खलिस्तानी एकत्रित येत भारताविरोधात घोषणा करू लागले.

हत्यारे हातात घेऊन खलिस्तानी समर्थकांची भारताविरोधात घोषणाबाजी
रिपोर्ट्सनुसार, अलबर्टा येथे जवळजवळ अडीच डझन खलिस्तानी समर्थक जमले होते. यापैकी काही जणांच्या हातात हत्यारे आणि धारधार तलवारी होत्या. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी घटनास्थळी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यासह काहींना ताब्यात घेतले.

दरम्यान, याआधीही खलिस्तानी समर्थकांनी 1 मार्चला सरे आणि 11 मार्चला एडमोंटन येथे आंदोलन केले होते. भारतीय उच्चायुक्त संजय कुमार यांच्या समारंभाच्या कार्यक्रमास्थळी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी (16 मार्च) कॅलगरी येथे हा कार्यक्रम रद्द केला. यानंतर शनिवारी (17 मार्च) दुपारी उच्चायुक्त संजय वर्मा यांचा दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तेथेही खलिस्तान्यांनी आंदोलन केले.

दरम्यान, भारत आणि कॅनडामधील बिघडलेल्या संबंधादरम्यान, भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा (Sanjay Varma) पहिल्यांदाच पश्चिम कॅनडाच्या दौऱ्यावर आले होते. कॅनडामध्ये खलिस्तान्यांच्या हालचालीवर वर्मा यांनी चिंता व्यक्त केली आहे. खरंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (PM Justin Trudeau) यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येचा आरोप भारतावर लावला आहे

आणखी वाचा : 

शाळेतील विद्यार्थिनीचा वर्गातील मुलांनीच तयार केला Deepfake फोटो, AI चा केला जातोय गैरवापर

CAA संदर्भात अमेरिकेने व्यक्त केली चिंता, भारतात लागू करण्याच्या प्रक्रियेवर असणार करडी नजर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, सातत्याने तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्राथमिक निवडणुकीत मिळाला विजय