Kenya Flood : केनियात पुराचा हाहाकार! 38 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक बेघर आणि अनेकजण बेपत्ता झाल्याची स्थिती

| Published : Apr 25 2024, 08:05 AM IST / Updated: Apr 25 2024, 08:12 AM IST

Kenya Floods cause widespread devastation in Nairobi

सार

Kenya Flood : केनियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात 38 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना आपले घर सोडावे लागले आहे.

Kenya Flood Update :  केनियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशाच्या कारभारावरही परिणाम झाला आहे. सिन्हुआच्या रिपोर्ट्सनुसार, केनियामध्ये निर्माण झालेल्या पुराच्या स्थितीमुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे.

केनियाची राजधानी नैरोबीच्या मथारे झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सहाजण बेपत्ता झाले आहेत. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिक घरात अडकले गेले. याशिवाय घरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांना आपले घर सोडावे लागले आहे. 

केनियात जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसाने केनियाला चांगलेच झोडपून काढल्याने झाडे पडली आहेत. पावसाचे पाणी सर्वत्र साचल्याने काही ठिकाणचा शहराशी संपर्क तुटला आहे. राजधानीच्या दक्षिण दिशेला असलेल्या किटेंगेला येथे अथी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने पुलावर पाणी साचले गेले आहे. यामुळे हजारोंच्या संख्यने व्यावसायिक आणि कर्मचारी अडकले गेले आहेत.

एक लाखांहून अधिक नागरिक बेघर
केनियातील मुसळधार पावसामुळे देशातील कमीत कमी 24 ठिकाणांना फटका बसला आहे. यामुळे 1,10,000 पेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. पाच हजार जनावरांचा मृत्यू होण्यासह शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

200 मिमीपर्यंत झाला पाऊस
केनियामध्ये काही ठिकाणी एका दिवसात 200 मिमीचा पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना पुराचा फटका बसण्यासह बेघरही झाले आहेत.

नागरिकांचे दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थापन करण्याचे आदेश
मुसळधार पावसानंतर देशभरात पुर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचे दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय केनियातील अधिकाऱ्यांनी पुर आणि पुराचा फटका बसलेल्या स्थानिकांना उंच ठिकाणी घेऊन जाण्याचे निर्देश दिले आहेत.

आणखी वाचा : 

US : इंधन घेऊन जाणाऱ्या एअरक्राफ्टचा अलास्कामध्ये अपघात, दोन जणांचा मृत्यू

Earthquake : ताइवानमध्ये जाणवले 80 भूकंपाचे धक्के, भीतीपोटी नागरिकांनी घरातून काढला पळ