सार
इराणने शनिवारी रात्रीचे शेकडो सॅटेलाईटने इस्राइलवर हल्ला केला. त्यानंतर येथील भारतीय दूतावासाने आपला नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणने शनिवारी रात्रीचे शेकडो सॅटेलाईटने इस्राइलवर हल्ला केला. त्यानंतर येथील भारतीय दूतावासाने आपला नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय नागरिकांना शांत राहण्याचा आणि दिलेला सल्ला ऐकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय दूतावासाने काय दिली माहिती? -
भारतीय दूतावासाने यावेळी माहिती देताना सांगितलं की, भारतीय नागरिकांनी शांत राहून सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यानंतर भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दूतावास तत्पर असल्याची माहिती दिली. भारतीय दूतावास हे घडत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवून असून आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. यावेळी भारतीय नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि गुगल फॉर्मची लिंक देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
इराण आणि इस्राइलमध्ये प्रवास न करण्याचा दिला सल्ला -
भारतीय नागरिकांना इराण आणि इस्राइल या दोन देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे भारतातील नागरिकांनी प्रवास करून नये असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. भारतीय विमाने युरोपला जात असताना इराणवरून न जाता दुसरा रस्ता पकडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे युरोपला पोहोचण्यात दोन तास उशीर होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती -
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "सर्व भारतीयांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्राइल येथे प्रवास करू नये. येथील दूतावासांशी नागरिकांनी संपर्क साधावा आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी माहिती देण्यात आली आहे.
आणखी वाचा -
Iran Israel Attack : "मिशन ट्रू प्रॉमिस" च्या माध्यमातून इराणचे उद्दिष्ट्य साध्य ; चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा
धक्कादायक ! पाकिस्तानात शीख व्यक्तीला नग्न करून मारले ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आले प्रकरण