सार

इस्रायलवर शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी पाच हजार रॉकेट्सच्या मदतीने भीषण हल्ला केल्यानंतर आता इस्रायली लष्करानेही (Israel Terrorist Attack) सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

 

Israel Vs Hamas War : इस्रायलवर शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी (Terrorist attacks in Israel) तब्बल पाच हजार रॉकेट्सचा मारा करत भीषण हल्ला केल्यानंतर आता इस्रायली लष्करानेही (Israel Hamas War Updates) सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ‘हमासच्या हल्ल्याविरोधात युद्ध पुकारत आहोत’, अशी घोषणाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी केली. यानंतर इस्रायलच्या (Israel-Hamas war live news) सैनिकांकडून गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले करण्यात येत आहेत. 

हमासने केलेल्या भीषण हल्ल्यात 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान इस्रायल (Israeli airstrikes on Gaza) आणि हमासमधील (How Powerful Is Hamas) युद्धाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. या दौघांपैकी नेमके कोण लष्करी सामर्थ्यात शक्तिशाली आहे? यावरही चर्चा रंगताना दिसतेय. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

हमासकडे कोणकोणती शस्त्रास्त्रे आहेत?

इस्रायल आणि हमासच्या (Israel and Palestine Conflict) लष्करी सामर्थ्य क्षमतेची थेट तुलना होऊ शकत नाही. कारण हमास ही एक दहशतवादी संघटना आहे. पण या हल्ल्याच्या पद्धतीचे निरीक्षण केल्यास हमासने केलेला भीषण दहशतवादी हल्ला संपूर्ण लष्करी शैलीतील ऑपरेशनप्रमाणे होता. 

दूरवर मारा करण्याची क्षमता असणारे रॉकेट्स, ड्रोन आणि ग्लायडर यासारख्या नवीन शस्त्र प्रणालीचा वापर करत त्यांनी इस्रायलवर हल्ला चढवला. यावरून हमासकडे प्रगत युद्ध सामग्री उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

हल्ल्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर

हमासचा इस्रायलवरील (Israel vs Hamas Armoury) दहशतवादी हल्ला हा संपूर्ण लष्करी शैलीतील ऑपरेशनप्रमाणे आहे. हमासकडून नवनवीन आणि अतिशय प्रगत शस्त्र-साधनांचा वापर केला गेला. इस्रायलला प्रत्युत्तराची झलक दाखवण्यासाठी अत्याधुनिक ग्लायडरचा वापर करण्यात आला. इतकेच नव्हे तर इस्रायलचा सर्वात सुरक्षित टँक मर्कवा IV नष्ट करण्यासाठी हमासने पहिल्यांदाच सशस्त्र ड्रोनचा वापर केला. तर हल्ल्यासाठी केलेल्या रॉकेट्सची स्ट्राइक क्षमता 70 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करण्यास सक्षम आहे. हमासच्या लष्करी क्षमतेत अनपेक्षित झालेली वाढ पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

सागरी मार्गानेही हल्ला करण्याचे प्रयत्न

दुसरीकडे हमासच्या (Hamas military strength vs Israel military strength) दहशतवाद्यांनी सागरी मार्गेही इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला, पण यातील कित्येक बोटी इस्रायली सैनिकांनी अडवल्या होत्या. हमासच्या ‘अल-कसाम ब्रिगेड’द्वारे (Hamas military equipment) सशस्त्र यंत्रणा वापरली जात आहे. ही हमासच्या लष्करी बटालियनपैकी एक आहे, जी दहशतवादी कारवाया करत असते.

दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

इस्रायली लष्कराचे सामर्थ्य

इस्रायलची लष्करी क्षमताही (Israels Military Strength) अतिशय प्रगत यंत्रणांनी सुसज्ज आहे. हा देश आपल्या गुप्तचर यंत्रणेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण आता निर्माण झालेल्या मोठ्या लष्करी संघर्षासाठी त्यास पारंपरिक लष्करी सामर्थ्यांवर अवलंबून राहावे लागले. जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या इस्त्रायली वायुसेनेकडे खालील प्रमाणे शस्त्रास्त्र प्रणाली आहेत.

  • इस्रायलकडे F-35 स्टेल्थ लढाऊ विमान आहेत.
  • क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ला हाणून पाडू शकतात अशा क्षेपणास्त्र नौका देखील आहेत.
  • जवळपास 500 मर्कवा टँक देखील आहेत.
  • स्मार्ट बॉम्बची एक विस्तृत शृंखला आहे, जे थेट आपल्या लक्ष्यांवर हल्ला करतात. विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये अन्य गोष्टींचे नुकसान कमी प्रमाणात होते, अशी माहिती आहे.
  • इस्रायलकडे अत्याधुनिक नेटवर्क-केंद्रीत प्रणाली आहे. ज्यामध्ये लक्ष्याचा शोध घेऊन हल्ला चढवण्यासाठी सेन्सरचा वापर केला जातो.
  • इस्रायलकडे अणुशक्तीचेही सामर्थ्य आहे.

आणखी वाचा :

मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL

Venice Bus Accident : पर्यटकांनी भरलेली बस रेलिंग तोडून कोसळली रेल्वे ट्रॅकवर, 21 जणांचा मृत्यू

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?