इस्रायलमध्ये सध्या भारतीयांची संख्या किती आहे? यावेळेस भारतीय तेथे काय करताहेत? युद्धाच्या परिस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का? जाणून घेऊया सविस्तर...
रिपोर्टनुसार, इस्रायलमध्ये सध्या 18 हजार भारतीय राहत आहेत. यापैकी जवळपास 900 भारतीय हे विद्यार्थी आहेत. येथील सर्व भारतीय सुरक्षित आहेत.
आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार, इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 80 हजार यहूदी राहतात. हा रिपोर्ट वर्ष 2016 मधील आहे.
मीडिया रिपोर्टनुसार इस्रायलमध्ये राहणारे भारतीय तेथील वृद्धांची देखभाल, हिऱ्यांचा व्यापार, माहिती-तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
इस्रायल-हमासमधील युद्धादरम्यान इस्रायलमध्ये राहणारे व काम करणारे सर्व भारतीय पूर्णतः सुरक्षित आहेत. भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.
इस्रायलमधून भारतात 2 बिलियन डॉलरहून अधिक सामानाची आयात होते. यामध्ये मोती, मौल्यवान दगड, विद्युत उपकरणे, खत, तेल, शस्त्र , यंत्रसामग्री इत्यादी वस्तू...
इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 700 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दीड हजारहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
या युद्धामध्ये भारतात कच्चे तेल व सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडीवरही मोठा परिणाम होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.