सार

Bus Accident News : इटली देशातील व्हेनिस शहरामध्ये मोठा अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Italy Bus accident News : इटली देशातील व्हेनिस शहरामध्ये (Venice Accident News In Marathi) बस अपघातामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मिथेन गॅसवर (Methane Gas Bus Accident) चालणाऱ्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्यानंतर बस पुलाचं रेलिंग तोडून थेट रेल्वे ट्रॅकवरच कोसळली. यानंतर अपघातग्रस्त वाहनाने लगेचच पेट घेतला. या अपघातात (Venice Tragedy) 21 जणांना जीव गमवावा लागला आहे. येथील मेयर लुइगी ब्रुगनारो यांनी सोशल मीडियावर दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळेस बचाव पथकाने युद्धपातळी आपले कार्य सुरू करत 20 जखमींना (Italy Bus Crash) रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती स्थानिक गव्हर्नरने दिली आहे.

पर्यटक करत होते परतीचा प्रवास

पर्यटकांनी भरलेली ही बस (Italy Bus Crash News) व्हेनिस शहरातील ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत होती. संध्याकाळी (3 ऑक्टोबर 2023) 7.30 वाजण्याच्या सुमारास एका पुलाजवळ हा अपघात झाला. शहरातील मेस्त्रे आणि मार्गेरा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील पुलावरून खाली कोसळल्यानंतर बसने पेट घेतला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Corriere Della Sera या स्थानिक वृत्तपत्रातील माहितीनुसार, पुलावरील रेलिंग तोडून बस जवळपास 100 फूट खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर कोसळली. यादरम्यान वीजेच्या तारांवर धडकल्यानंतर बसला आग देखील लागली.  

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी व्यक्त केला शोक

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसंच दुर्घटनेवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर आणि वाहतूक मंत्र्यांच्याही त्या संपर्कात आहेत. दुसरीकडे बसचालक अचानक आजारी पडल्याने दुर्घटना घडली असू शकते, अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा 

मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL

Israel Vs Hamas : इस्रायल की हमास, सर्वात शक्तिशाली कोण? जाणून घ्या सविस्तर

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?