सार

दक्षिण आफ्रिकेत एका आरोपीने हत्येचा पुरावा मिटवण्याच्या नादात चक्क संपूर्ण इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत इमारतीमधील 76 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

South Africa Crime News : हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी संपूर्ण इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना दक्षिण आफ्रिकेत घडली आहे. खरंतर आरोपीला हत्या केल्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करायचा होता. यामुळे मृतदेहाला आग लावली असता ती संपूर्ण इमारतीत पसरली गेली. अशातच संपूर्ण इमारतीला आग लागत त्यामध्ये 76 जणांचा मृत्यू झाला आहे.

जोहान्सबर्ग येथील घटना
जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील इमारतीला आग लागल्याने 76 जणांचा मृत्यू झाला आहे. पण आगीचे कारण समजल्यानंतर सर्वजण हैराण झाले आहेत. खरंतर, एका व्यक्तीने हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला आग लावली. यामुळेच आग संपूर्ण इमारतीत पसरली गेली.

आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता आरोपीच्या विरोधात एक नव्हे 76 जणांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर हे प्रकरण अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने पोलिसांकडे हत्येची कबुली दिली आहे.

नक्की काय घडले?
दक्षिण आफ्रिकेतील मीडियानुसार, 29 वर्षीय व्यक्तीने जीर्ण इमारतीच्या तळमजल्यावर एका व्यक्तीला मारहाण करत त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर रॉकेल टाकून आग लावली. आरोपीने हत्येची कबुली देत पोलिसांना सांगितले की, तो अंमली पदार्थांचे सेवन करतो आणि इमारतीत राहणाऱ्या तांझानियातील ड्रग्ज विक्रेत्याने त्याला हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला लवकरच कोर्टासमोर सादर केले जाणार आहे.

आणखी वाचा : 

Russian Plane Crash : 65 युक्रेनी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या रशियातील हवाई दलाच्या विमानाला अपघात, पाहा दुर्घनेचा धक्कादायक VIDEO

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO

Earthquake : अफगाणिस्ताननंतर दिल्ली आणि उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के