तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO

| Published : Jan 15 2024, 02:56 PM IST / Updated: Jan 15 2024, 02:59 PM IST

Viral Video

सार

सोशल मीडियावर कारच्या काचेमध्ये मुलाचे डोकं अडकल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

Viral Video : सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावनात्मक असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून त्यामध्ये लहान मुलाचे डोकं कारच्या काचेमध्ये अडकल्याचे दिसून येत आहे.

कारच्या काचेमध्ये अडकल मुलाचं डोकं
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, कारच्या खिडकीमध्ये मुलाचे डोकं अडकल गेलयं. यादरम्यान एका प्रवाशाने मुलाला सुखरुप बाहेर काढले आहे. व्हिडीओ पाहून वाटते की, कार सुरू होणार असल्याने चालकाने कारच्या काचा वरती घेण्यासाठी बटण दाबले. पण त्याचवेळी कारमधील मुलगा डोकं बाहेर काढून पाहू लागला. अशातच मुलाचे डोकं कारच्या खिडकीत अडकले गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.

कारच्या खिडकीची काच फोडून वाचवला मुलाचा जीव
कारच्या खिडकीत मुलाचं डोक अडकल्याने चालकाला खिडकी खाली देखील करता येत नव्हती. याचवेळी एका प्रवाशाने कारजवळ धावत येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुलाचे डोकं खिडकीतून बाहेर निघत नसल्याने त्याने कारची काच फोडली आणि त्याला सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने मुलाचा जीव बचावला गेला. खरंतर अशाप्रकारचे व्हिडीओमधून पालकांनी आपल्या मुलांसोबत प्रवास करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, एखाद्याचे आयुष्य बचाव करणारा हा व्हिडीओ आहे. दुसऱ्याने मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंत केले आहे.

आणखी वाचा : 

Viral : उडणारी कोंबडी कधी पाहिलेय का? पाहा सोशल मीडियात व्हायरल होणारा VIDEO

UAE मधील हे नियम माहितीयेत का? कायदे मोडणाऱ्याला मिळते कठोर शिक्षा

अलास्का एअरलाइन्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानाच्या खिडकीची काच हवेतच निघाल्याचा पाहा धक्कादायक VIDEO