Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

| Published : Mar 23 2024, 08:23 AM IST / Updated: Mar 23 2024, 08:31 AM IST

court hammer  0.

सार

पुण्यातील मावळ येथे एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Crime News : पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (22 मार्च) मावळ (Maval) तालुक्यातील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येसाठी 24 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे. दरम्यान, मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ऑगस्ट 2022 मधील आहे.

अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना कामशेत येथे राहणाऱ्या आरोपीने तिचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करत हत्याही केली. यानंतर मुलीचा मृतदेह आरोपीच्या घरामागे सापडला होता.

या प्रकरणात साक्ष न देण्यासह पोलिसांना घटनेची माहिती न दिल्याने आरोपीच्या आईला देखील सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला होता. पण नंतर पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले असता आरोपींनी स्वत: या घटनेत दोषी नसल्याचे म्हटले होते.

सरकारी वकीलांनी सिद्ध केला आरोपींवरील गुन्हा
सरकारी वकील वरिष्ठ अधिवक्ता राजेश कावेडिया (Rajesh Kavediya) यांच्यानुसार, आरोपींनीच अंगणात खेळत असलेल्या मृत मुलीचे अपहरण केले. यानंतर आपल्या घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आणि हत्याही केले. यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह आपल्याच घरामागे एका झाडाखाली लपवण्याचा प्रयत्नही केला. कावेडिया यांनी म्हटले की, आरोपीच्या आईने मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून मृत मुलीचे कपडे आणि वस्तू लपवल्या. यामुळेच दोन्ही आरोपींना शिक्षा मिळावी.

कोर्टाचे मानले आभार
अधिवक्ता राजेश यांनी पुढे म्हटले की, आरोपी लैंगिक गोष्टींमागे वेडा आहे. याबद्दलचे सतत विचार आरोपीच्या डोक्यात सुरू असतात. याशिवाय चाइल्ड पोर्नोग्राफीच्या आहारी गेलेला आहे. या प्रकरणात सुनावणी झाल्याने कावेडिया यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.

या घटनेसंदर्भातील सुनावणी ऑक्टोंबर, 2022 रोजीच्या आसपास झाली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर केवळ आठ महिन्यात 29 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, आरोपीने केलेला गुन्हा अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहे. कोर्टात सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीपी क्षीरसाघर यांच्याद्वारे करण्यात आली.

आणखी वाचा : 

Double Murder in UP : उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड, दोन मुलांची गळा चिरुन हत्या

पत्नीसोबत शेअर केला अश्लील व्हिडीओ, बंगळुरुतील कोर्टाने पतीला एका महिन्याच्या तुरुंगवासासह 45 हजार रुपयांचा ठोठावला दंड

Crime : बत्ती गुल होण्याच्या भीतीपोटी मुंबईतील नागरिकाने गमावले तीन लाख रुपये, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर…