सार

उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बदाऊ येथे दोन मुलांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.

Double Murder in UP : उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे तीन अल्पवयीन मुलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून तिसरा मुलगा जखमी झाला आहे. जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपी साजिद याला पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार बाबा कॉलोनी मध्ये राहतात. विनोद कुमार आणि त्यांची पत्नी घरातूनच पार्लर चालवतात. हल्ला झाला त्यावेळी विनोदची पत्नी आपल्या तीन मुलांसह घरातच होती. याशिवाय आरोपीचेही सलून आहे. खरंतर, आरोपी आणि विनोदच्या परिवारामध्ये नेहमीच वाद व्हायचे.

पीडित विनोदने आरोपीच्या विरोधात दाखल केला गुन्हा
पीडित विनोदने आरोपी साजिद आणि त्याचा भाऊ जावेदच्या विरोधात गुन्हा दाखल केला. एफआयारनुसार (FIR), आरोपी साजिदने पत्नीच्या बाळंपतपणासाठी विनोदच्या पत्नीकडे पैसे मागितले. विनोदची पत्नी पैसे आणण्यासाठी गेली असता आरोपीने त्याला बरे वाटत नसून गच्चीवर जायचे असल्याचे विनोदच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर आरोपी साजिद विनोदच्या मुलांना घेऊन गच्चीवर आला. येथे आल्यानंतर साजिदने भाऊ जावेदला फोन केला. विनोदची पत्नी पैसे घेऊन आलीअसता तिने जावेद आणि साजिदच्या हातात धारधार चाकू असल्याचे पाहिले. साजिदने तिन्ही मुलांवर हल्ला केला असता दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हल्ला केल्यानंतर दोघांनीही पळ काढत विनोदच्या पत्नीला म्हटले की, आम्ही आमचे राहिलेले अपूर्ण काम आज पूर्ण करू."

मुख्य आरोपीने मुलांवर केला जीवघेणा हल्ला
शेजारील स्थानिकांनी घटनेबद्दल माहिती देत म्हटले की, मुख्य आरोपी साजिद पीडित विनोदच्या घरी गेला. तेथे गेल्यानंतर विनोदची तिन्ही मुलं होती. साजिदने त्यावेळीच तिघांवर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान, विनोदची पत्नी घरातच असलेल्या पार्लरमध्ये होती. मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर विनोदच्या पत्नीसह शेजारील मंडळी धावत आली. त्यावेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मुलांच्या हत्येनंतर परिसरात गदारोळाची स्थिती निर्माण झाली.

मुख्य आरोपीला पोलिसांनी घातले कंठस्नान
हत्येनंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना स्थानिकांनी मृत मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊ दिले नाही. याशिवाय घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेलाही परत पाठवले गेले. स्थानिकांनी परिसरात तोडफोडही केली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन
हत्येवर बदाऊचे जिल्हाधिकारी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, एका व्यक्तीने घरात घुसून दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिकांनी गदारोळ घालण्यास सुरूवात केली असता. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. मृत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

पत्नीसोबत शेअर केला अश्लील व्हिडीओ, बंगळुरुतील कोर्टाने पतीला एका महिन्याच्या तुरुंगवासासह 45 हजार रुपयांचा ठोठावला दंड

इंदापूर येथील घटना : तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केली गोळ्या झाडून हत्या...

Crime : बत्ती गुल होण्याच्या भीतीपोटी मुंबईतील नागरिकाने गमावले तीन लाख रुपये, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर…