सार
Pakistan : पाकिस्तानातील एमक्यूएम-पी नेते सैयद मुस्तफा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सैयद मुस्तफा भारताचे कौतुक आणि पाकिस्तानच्या स्थितीवर ताशेरे ओढताना दिसत आहेत.
Pakistan MP's fiery speech goes viral : पाकिस्तानातील खासदार सैयद मुस्तफा कमाल (Syed Mustafa Kamal) यांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेचे कौतुक केले आहे. पण पाकिस्तानातील कराची येथील स्थितीवर मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) पक्षाच्या नेत्याने म्हटले की, भारत चंद्रावर पोहोचत आहे आणि येथे कराची खुल्या गटारात मुलं पडून मृत्यू झाल्याची बातमी करतोय.
नक्की काय म्हटलेय?
कमाल यांनी बुधवारी (15 मे) आपल्या संसदेतील भाषणात म्हटले की, आज कराचीमधील स्थिती एवढी वाईट आहे की, एका बाजूला जग चंद्रावर जातोय. पण कराचीत गटात मुलं पडून मृत्यू झाल्याची बातमी दाखवतेय. याशिवाय कराचीतील ताज्या पाण्याच्या तुटवड्यावच्या मुद्द्यावरही कमाल यांनी प्रकाश टाकला आहे.
एमक्यूएम-पी नेत्याने एका रिपोर्टचा हवाला देत असे देखील म्हटले, “कराचीमध्ये 70 लाख आणि पाकिस्तानातील 2.6 कोटी मुलांना शाळेत जाता येत नाहीये. काराची पाकिस्तानाचे आर्थिक इंजिन आहे. पाकिस्तान स्थापन झाला तेव्हा दोन बंदरे कार्यरत आहेत ती देखील कराचीतच आहेत. आपल्याकडे संपूर्ण पाकिस्तान, मध्ये आशिया ते अफगाणिस्तानपर्यंतचा प्रवेश द्वार आहे. तरीही 15 वर्षांपर्यंत पाकिस्तानला कधीच थोडे देखील ताजे पाणी देण्यात आले नाही. याशिवाय जे पाणी यायचे ते टँकर माफियांनी जमा केले आणि कराचीतील नागरिकांना विक्री केले.”
पाकिस्तानातील शाळांची स्थिती
सैयद मुस्तफा कमाल यांनी म्हटले, आपल्याकडे एकूण 48 हजार शाळा आहेत. पण नव्या रिपोर्टमध्ये म्हटलेय की, यापैकी 11 हजार शाळा भूताटकी आहेत. सिंध येथे 70 लाख मुलांना शाळेत जाता येत नाही. देशात एकूण 2,62,00,000 मुलं शाळेत जात नाहीत. आपण मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.
भारताच्या चांद्रयान मोहिमेचे कौतुक
गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात भारताचे चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरले गेले. अशातच भारत आंतराळात पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. पण पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) कडून विस्तारित निधी सुविधेअंतर्गत नवे कर्ज हवेय.
आणखी वाचा :
2029 मधील जगातील मोठ्या 10 अर्थव्यवस्था, भारताचा क्रमांक कितवा?
AstraZeneca कंपनीने जगभरातून परत मागवून घेतला कोविशिल्ड लसीचा साठा, नक्की कारण काय?