'भारताने पाकिस्तानात वर्ष 2020 नंतर 20 दहशतवाद्यांची केली हत्या', The Guardian च्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात दिलीय प्रतिक्रिया

| Published : Apr 05 2024, 09:52 AM IST / Updated: Apr 05 2024, 09:58 AM IST

External Affairs Minister S Jaishankar
'भारताने पाकिस्तानात वर्ष 2020 नंतर 20 दहशतवाद्यांची केली हत्या', The Guardian च्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात दिलीय प्रतिक्रिया
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

‘द गार्डियन’ वृत्तपत्राने दावा केला होता की, भारतीय गुप्त एजेंसींनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात 20 दहशतवाद्यांची हत्या केली होती. या रिपोर्टवरच परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

New Delhi : भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची हत्या केल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) एक विधान जारी करत म्हटले की, अमेरिकेतील वृत्तपत्र ‘द गार्डियन’ (The Guardian) यांनी केलेला दावा खोटा आहे. याशिवाय भारताच्या विरोधा दुर्भावनापूर्ण प्रचार केला जातोय. खरंतर, अन्य देशांतील दहशतवाद्यांची हत्या करणे भारताची निती नाही.

वृत्तपत्राचा दावा
अमेरिकेतील वृत्तपत्र ‘द गार्डियन’ यांनी आपल्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक दावे केले होते. या दाव्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील गुप्त अधिकाऱ्यांचाही हवाला देण्यात आला होता. द गार्डियन यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय गुप्त एजेंसी रॉ (RAW) कडून 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

याशिवाय गार्डियनने भारतीय गुप्त अधिकाऱ्यांचा हवाला देत आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, भारतीय गुप्त एजेंसी इस्राइलमधील मोसाद (Mossad) आणि रशियातील केजीबीच्या (KGB) आधारवरच या हत्या करत आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले होते की, या हत्यांचा थेट आदेश पंतप्रधानांच्या कार्यालयातून देण्यात आला आहे. पाकिस्तानातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, या सर्व हत्या युएई (UAE) स्थित भारतातील स्लीपर सेलद्वारे करण्यात आल्या आहेत.

कॅनडाने लावला होता निज्जरच्या हत्येचा आरोप
द गार्डियनचे दावे आणि भारत सरकारसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांवर देण्यात आलेल्या उत्तरांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कॅनडा आणि अमेरिकेकडून असे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील नात्यात वाद निर्माण झाले होते.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी फुटरीतावादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर लावला होता. निज्जरवर एका गुरुवाद्वाराच्या बाहेर गोळीबार करण्यात आला होता. याशिवाय अमेरिकेने दावा केला होता की, निज्जरने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट उलटून लावला होता. अमेरिकेने या प्रकरणात निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकासह एका भारतीय अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप लावला होता.

आणखी वाचा : 

2024 च्या सुरुवातीलाच बाबा वेंगा यांचे हे 4 भाकीत ठरले खरे !

तर महिलांना दगडाने ठचून मारणार... तालिबानच्या नेत्याचा पुन्हा एकदा फर्मान; अफिगाणिस्थानात महिलांना जगणे झाले मुश्किल

मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या जगभरातील नागरिकांसाठी जारी केला अ‍ॅलर्ट, दिल्यात या सूचना