खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या 'हिट स्क्वॉड' मधील तिघांना अटक, कॅनडातील वृत्तपत्राने लॉरेंन्स बिश्नोई गँगसोबत जोडले कनेक्शन

| Published : May 04 2024, 09:30 AM IST / Updated: May 04 2024, 09:37 AM IST

Nijjar  1.jp
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या 'हिट स्क्वॉड' मधील तिघांना अटक, कॅनडातील वृत्तपत्राने लॉरेंन्स बिश्नोई गँगसोबत जोडले कनेक्शन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणात तीन आरोपींना शुक्रवारी (3 एप्रिल) अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची करडी नजर होती.

Canada : जून, 2023 मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्यावर कॅनडात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ताजे अपडेट म्हणजे की, कॅनडातील पोलिसांनी निज्जरच्या हत्येसंबंधित काहीजणांना अटक केली आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत होतोय की, निज्जरच्या हत्येत लॉरेंन्स बिश्नोई गँगचा हात होता का?

आरोपी बिश्नोई गँगमधील असल्याचा दावा
कॅनडातील एका वृत्तपत्राने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दावा केलाय की, निज्जरच्या हत्येतील एक कथित हिट स्क्वॉडच्या (Heat Squad) सदस्यांना अटक केली आहे. हे सर्वजण भारतीय तरुण आहेत. याशिवाय सर्वांचा लॉरेंन्स बिश्नोई गँगसोबत (Lawrence Bishnoi Gang) संबंध असल्याचाही दावा केला आहे.

पुन्हा एकदा भारतावर लावले आरोप
वृत्तपत्रातून पुन्हा एकदा भारतावर निज्जरच्या हत्येचे आरोप लावण्यात आले आहेत. कॅनडाच्या पोलिसांनी हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली कमलप्रीत सिंह, करणप्रीत सिंह आणि करण ब्रार यांना अटक केली आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आरोपी तत्काळ व्हिसावर वर्ष 2021 मध्ये कॅनडात आले होते. यामधील काहींचा स्टुटेंड व्हिसा होता पण कॅनडात शिक्षण घेतले नाही.

लॉरेंन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कनेक्शन हरियाणा आणि पंजाबमधील क्रिमिनल सिंडीकेटने सांगितले आहे. याचा संबंध कुख्यात गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोई असल्याचे म्हटले जातेय. कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी सुखदूर उर्फ सुक्खा दुकुने याच्या हत्येमागेही लॉरेंन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे म्हटले आहे.

निज्जरच्या हत्येत नक्की काय घडले?
गेल्या वर्षात जून महिन्यामध्ये कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली होती. निज्जर खलिस्तानी दहशतवादी असण्यासह खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. गेल्या काही वर्षांपासून निज्जर कॅनडात स्थायिक होता. येथून भारताच्या विरोधात खलिस्तानी दहशतवादाला प्रोत्साहन देत होता.

दरम्यान, ट्रुडो ज्यावेळी वर्ष 2018 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते त्यावेळी पंजाबमधील तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना खलिस्तानी दहशतवाद्यांची एक यादी दिली होती. यामध्ये निज्जरचेही नाव होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

वर्ष 2010 मध्ये पटियालातील एका मंदिराबाहेर झालेल्या बॉम्ब स्फोटात निज्जरच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंसाचार, दहशतवादी हालचालींना प्रोत्साहन देणे अशा काही गोष्टींसह काही प्रकरणात पोलिसांकडून निज्जरचा शोध घेतला जात होता. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. याशिवाय NIA कडून निज्जरवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

Israel Hamas Conflict : अमेरिकेतील विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये तीव्र आंदोलन, कोलंबियात 2 हजार विद्यार्थ्यांना अटक

'भारत महासत्ता होतोय आणि आपण भीक मागतोय...', पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या नेत्याने भर संसदेत व्यक्त केली मनातील खदखद