सार

इज्राइल आणि हमासचे युद्ध अद्याप सुरुच आहे. अशातच युद्धा विरोधात कोलंबियासह अमेरिकेली विद्यापीठातील पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. अशातच कोलंबियात दोन हजार तर लॉस एंजेलिसमधील 200 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

Israel Hamas Conflict : इज्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धासह पॅलेस्टाइन समर्थकांकडून तीव्र आंदोलने केली जात आहेत. कोलंबिया ते कॅलिफोर्नियापर्यंतच्या महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थी सातत्याने आंदोलने करत आहेत. न्यूयॉर्क पोलिसांनी गेल्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावेळी दोन हजारांहून अधिक पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते.

सूत्रांनुसार, संपूर्ण अमेरिकेत इज्राइलच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. यावरून पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे. 24 तासांमध्ये लॉस एंजेलिसमधील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. असे सांगितले जातेय की, आतापर्यंत कोलंबियात दोन हजार, लॉस एजेंलिसमध्ये 200 तर फोरधममध्ये 15 आंदोलकर्त्यांना अटक केली आहे.

पोलिसांकडून फ्लॅश ग्रेनेडचा वापर
कॅलिफोर्नियातील विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन करणाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. अशातच विद्यापीठने पोलीस दलाला बोलावले. खरंतर, आंदोलनकर्त्यांना परिसरातून निघून जाण्याचे आदेश दिले होते. तरीही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलनकर्त्यांना विद्यापीठाच्या परिसरातून घालवण्यासाठी फ्लॅश ग्रेनेडचा वापर करण्यासह लाठीचार्जही केला. यादरम्यान, पोलिसांनी 200 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

इस्राइजल कंपन्यांसोबत कामकाज बंद करण्याची मागणी
इस्राइल-हमास युद्ध सुरू असताना पॅलेस्टाइन समर्थकांनी तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. आंदोलनकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, इस्राइलसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये. दरम्यान, 17 एप्रिलला कोलंबियात सुरू झालेल्या आंदोलन संपूर्ण देशातील विद्यापीठापर्यंत पोहचले आहे. विद्यार्थ्यांकडून इस्राइल आणि हमासमधील युद्धाला पूर्णविराम देण्याची मागणी करत आहेत. युद्धातील गाझा पट्टी येथे आतापर्यंत 34 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा : 

'भारत महासत्ता होतोय आणि आपण भीक मागतोय...', पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या नेत्याने भर संसदेत व्यक्त केली मनातील खदखद

पाकिस्तानने भारताकडे पाहण्याची दाखवली हिंमत, लोकसभा निवडणुकीबाबत बोलली मोठी गोष्ट