स्पेसएक्स कंपनीच्या विक्रमी आयपीओनंतर एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनर ठरले असून, त्यांची एकूण संपत्ती १ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत ६० अब्ज डॉलर्सहून अधिक वाढ झाली, ज्यामुळे त्यांनी अनेक देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठी संपत्ती मिळवून नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांनी संपत्तीचा एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्पेसएक्स कंपनीच्या विक्रमी आयपीओननंतर त्यांची एकूण संपत्ती हि १ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ८६ लाख कोटी रुपये झाली आहे. ते आता जगातील पहिले ट्रिलियनर ठरले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

एका दिवसात किती वाढली संपत्ती? 

एका दिवसात मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांनी शेअर बाजारात पदार्पण केलं आणि संपत्तीत प्रचंड वाढ झाली. कंपनीचे बाजारमूल्य 2 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आणि त्याचा थेट फायदा मस्क यांच्या संपत्तीला झाला. एका दिवसातच त्यांच्या कंपनीत ६० अब्ज डॉलर्सहून जास्त वाढ झाली.

मस्क यांच्या संपत्तीने मोडले अनेक विक्रम 

एलॉन मस्क यांच्या संपत्तीने एका दिवसांतच अनेक विक्रम मोडले आहेत. त्यांची संपत्ती हि अनेक देशांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा मोठी झाली आहे. त्यांच्या खालोखाल येणाऱ्या अनेक अब्जाधीश उद्योजकांपेक्षा मस्क यांची संपत्ती जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मस्क यांच्या संपत्तीत किती सोन खरेदी करता येईल? 

मस्क यांच्या संपत्तीत आपण किती सोन खरेदी करता येईल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. जर एलॉन मस्क यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती वापरली तर ते हजारो टन सोने खरेदी करू शकतात. त्यांच्या आयपीओमधील अनेक पैसे हे स्पेसएक्स आणि टेस्लामधील गुंतवणुकीतून मोठा हिस्सा येतो.