सार
Dubai Princess to Husband : संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक यांच्या मुलीने पतीना इंस्टाग्रामवरुन घटस्फोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय राजकुमारीने पतीवर काही आरोप देखील लावले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
Dubai Princess to Husband on Instagram : संयुक्त अरब अमिरातचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान, दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेखा माहराने सार्वजनिक रुपात आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. शेखा माहराने दोन महिन्यांआधीच आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. शेखा माहराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पतीला घटस्फोट देत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय एक मेसेजही पोस्टमध्ये लिहिला आहे.
शेखा माहाराची इंस्टाग्राम पोस्ट
दुबईची राजकुमारी शेखा माहराने म्हटले, “प्रिय पती, तू एखाद्या दुसरीसोबत आहे. यामुळे आपल्या घटस्फोटाची घोषणा करत आहे. याशिवाय पोस्टमध्ये तीन वेळेस मी तुला घटस्फोट देतेय, मी तुला घटस्फोट देतेय आणि मी तुला घटस्फोट देतेय असे लिहिले आहे. पुढे शेखा माहराने काळजी घे असे म्हणत अखेरीस तुझी एक्स-पत्नी असेही म्हटले आहे.”
कोण आहे शेखा माहरा?
शेखा माहराचा जन्म 26 फेब्रुवारी, 1994 रोजी युएईमधील दुबईत झाले होते. शेखा माहरा 29 वर्षांची आहे. शेखा माहराचे वडील संयुक्त अमिरातीमधील तर आई ग्रिगोराकोस ग्रीसमधील आहे. शेखाने आपल्या शिक्षणाची सुरुवात दुबईतील एका खासगी शाळेतून केली होती. यानंतर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. तिने ब्रिटेनमध्ये एका विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पदवी मिळवली आहे. याशिवाय मोहम्मद बिन राशिद शासकीय प्रशासन कॉलेजमधूनही पदवी मिळवली आहे.
शेखा माहरा आपल्या सोशल वर्कसाठी ओखळली जाते. महिला सशक्तीसकरण आणि स्थानिक डिझाइनर यांना पाठिंबा देण्यासाठी शेख माहरा प्रसिद्ध आहे. याशिवाय दुबईच्या राजकुमारीला घोडेस्वारी फार आवडते. तिने अनेक घोडेस्वारी कार्यक्रमांमध्येही भाग घेतला आहे.
शेाख माहराचे लग्न आणि घटस्फोट
शेखा माहराने वर्ष 2023 मध्ये शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम याच्यासोबत विवाह केला होता. याच वर्षी कपलने मे महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता. या मुलीचे नाव राजकुमारीने शेखा माहरा बिंत माना बिन मोहम्मद अल मकतूम असे ठेवले आहे. दरम्यान, शेखा माहराने जुलै महिन्यातच आता घटस्फोटाची सार्वजनिक रुपात घोषणा केली आहे. यावेळी पतीचे अन्य महिलेसोबत संबंध असल्याचाही त्याच्यावर आरोप लावला आहे. घटस्फोटानंतर कपलने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. आपल्या प्रोफाइलवरील एकमेकांचे फोटोही दोघांनी हटवले आहेत. शेखा माहराने सार्वजनिक रुपात उचललेले पाऊस धाडसाचे असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा :
कोण आहेत उषा चिलूकुरी वेंस? भारतासोबत जोडले गेलेत खास संबंध
ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबारात ६ जण ठार आणि 28 हून अधिक जखमी, आयसिसने केला हल्ला