स्पेनमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना एका टीव्ही पत्रकाराला समुद्राच्या भयंकर लाटेने जोरदार धडक दिली. या घटनेत पत्रकार आणि कॅमेरामन दोघेही खाली पडले.

स्पेनमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करताना एका टीव्ही पत्रकाराला समुद्राच्या भयंकर लाटेने जोरदार धडक दिली. या घटनेत पत्रकार आणि त्याची कॅमेरामन दोघेही खाली पडले. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 'द संडे गार्डियन'च्या वृत्तानुसार, ही घटना स्पेनच्या बास्क कंट्री (Basque Country) मधील ओंडारोआ (Ondarroa) शहरात घडली. ईटीबी२ (ETB2) वाहिनीच्या 'युस्काडी कुडेट' (Euskadi Qudate) या कार्यक्रमासाठी पत्रकार सर्जियो ओवेजेरो (Sergio Ovejero) समुद्राच्या रौद्र रूपाचं रिपोर्टिंग करत होते. त्यावेळी अचानक एक मोठी लाट संरक्षक भिंत ओलांडून आली आणि तिने पत्रकाराला जोरदार धडक दिली.

सर्जियो ओवेजेरो प्रेक्षकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीबद्दल माहिती देत होते. तेवढ्यात एक मोठी लाट भिंतीवरून आली आणि तिने सर्जियो आणि त्यांची कॅमेरामन रॅकेल (Raquel) यांना धडक दिली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सर्जियो जमिनीवर पडले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये व्यत्यय आला आणि प्रेक्षकही थक्क झाले.

स्टुडिओमध्ये बसलेले प्रेझेंटर ओदेई एस्नाओला (Odei Esnaola) लाईव्ह फीड अचानक बंद झाल्यामुळे चिंतेत दिसले. संपर्क तुटल्यामुळे पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्याला गंभीर दुखापत तर झाली नाही ना, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. समुद्राच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या या टीमला लाटेने कसं उडवलं, हे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

Scroll to load tweet…

सुदैवाने, या घटनेत सर्जियो ओवेजेरो आणि रॅकेल दोघेही सुरक्षित असल्याची माहिती टीव्ही टीमने नंतर दिली. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. 'द संडे गार्डियन'च्या माहितीनुसार, सर्जियो यांनी सोशल मीडियावर मेसेज करून काळजी करणाऱ्या प्रेक्षकांना आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.