सार

पाकिस्तानात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी माजी पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका बसला आहे. सिफर प्रकरणी इमरान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशींनाही दोषी ठरवण्यात आले आहे.

Cipher Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) आणि माजी पररराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांना सिफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इमरान खान तोशाखाना प्रकरणात (Toshakhana Case) आधीपासूनच तुरुंगात आहेत.

पाकिस्तानात लवकरच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)  होणार आहे. अशातच कोर्टाने इमरान खान यांना सुनावलेल्या शिक्षेमुळे त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

येत्या 8 फेब्रुवारीला पाकिस्तानात लोकसभा निवडणूक होणार आहे. इमरान खानयांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) विरोधात सरकारने कठोर कार्यवाही केली आहे. पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही बंदी घालण्यात आली आहे. तरीही पक्षाकडून चिन्हाशिवाय निवडणूक लढवली जात आहे.

सिफर प्रकरण नक्की काय आहे?
सिफर प्रकरण राष्ट्रीय सुरक्षिततेसंबंधित आहे. सिफरमध्ये लिहिण्यात आलेली माहिती गुप्त ठेवण्यात येते. ही माहिती वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामासाठी वापरली जाऊ शकत नाही. 

इमरान खान यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले होते. या सर्व पक्षांनी मिळून इमरान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. इमरान खान यांचे सरकार काही पक्षांच्या युतीच्या मदतीने बनले होते. संसदेत सरकारला बहुमत सिद्ध करू न शकल्याने इरामान खान यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवरुन दूर व्हावे लागले होते.

इमरान खान यांनी पंतप्रधानांच्या खुर्चीवरुन त्यांना हटवण्याच्या प्रकाराला अमेरिकेचा कट असल्याचे म्हटले होते. इमरान खान यांनी सिफरच्या हवाल्याने दावा केला होता की, अमेरिकेने त्यांना खुर्चीवरुन हटवण्याची धमकी दिली आहे. इमरान खान यांच्यावर अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप आहे.

इमरान खान पंतप्रधान असताना शाह महमूद कुरैशी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले होते. यामुळे कुरैशी यांना देखील 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डिसेंबर (2023) मध्ये सुप्रीम कोर्टाने इमरान खान आणि शाह महमूद कुरैशी यांच्या अटकेनंतर जामिनासाठी मंजूरी दिली होती. इमरान खान अन्य प्रकरणांमध्येही तुरुंगात आहेत. सध्या इमरान खान आणि शाह महमूद कुरैशी तुरुंगात आहेत.

आणखी वाचा : 

US : पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अचानक झाला होता बेपत्ता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डीपफेक फोटो-व्हिडीओ व्हायरल, White Houseने दिली अशी प्रतिक्रिया

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू