Lifestyle

Travel

UAE मधील हे नियम माहितीयेत का? कायदे मोडणाऱ्याला मिळते कठोर शिक्षा

Image credits: Social Media

UAEच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

गुजरातमध्ये व्हायब्रंट ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान भारत दौऱ्यावर येणार आहेत. 

Image credits: X

रोड शो

युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे पंतप्रधानांसोबत साबरमती आश्रमापर्यंत सात किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. यावेळी देशाकडून जगाला एकजुटीचा संदेश दिला जाणार आहे.

Image credits: X

युएईमधील कठोर नियम

संयुक्त अरब अमिरातमध्ये कोणताही व्यक्ती लग्नाशिवाय एखाद्या महिलेसोबत राहू शकत नाही. याशिवाय लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाते.

Image credits: freepik

मृत्यूची शिक्षा

युएईमध्ये मृत्यूची शिक्षा तीन प्रकारे दिली जाते. यानुसार, सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालून फाशी देणे, दगड मारून हत्येची शिक्षा आणि तिसरी म्हणजे फाशीची शिक्षा.

Image credits: freepik

अस्वच्छ कार चालवणे

युएईमध्ये अस्वच्छ कार चालवणे गुन्हा मानले जाते. यासाठी तुम्हाला 3000 दिरहम (67 हजार रूपये) पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

Image credits: freepik

फोटो काढणे

एखाद्या व्यक्तीचा अज्ञातपणे फोटो काढणे व सोशल मीडियावर पोस्ट करण्यास युएईत बंदी आहे. यासाठी 5 लाख दिरहम (1 कोटी रूपयांहून अधिक) पेक्षा अधिक दंड व सहा महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो.

Image credits: freepik

गळाभेट किंवा किस करणे

युएईमध्ये सार्वजनिक ठिकाणी Kiss करणे, गळाभेट घेण्यास बंदी आहे. वर्ष 2005 मध्ये एका ब्रिटिश कपलने रेस्टॉरंटमध्ये किस केल्याने त्यांना एका महिन्याचा तुरुंगवास झाला होता.

Image credits: freepik