न्यूयॉर्कच्या LaGuardia एअरपोर्टवर एकच गोंधळ उडाला. एअर कॅनडा एक्सप्रेसचं CRJ-900 विमान टॅक्सीवेवर एका फायर ट्रकला धडकलं. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झालं आणि सर्व उड्डाणं थांबवण्यात आली.

न्यूयॉर्कमधलं LaGuardia एअरपोर्ट रविवारी रात्री एका मोठ्या घटनेनं हादरलं. एअर कॅनडा एक्सप्रेसचं एक विमान धावपट्टीवर चक्क एअरपोर्टच्याच फायर ट्रकला धडकलं. यानंतर तातडीने बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि अमेरिकेतील या सर्वात व्यस्त एअरपोर्टवरची सगळी उड्डाणं थांबवण्यात आली.

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात विमानाचं पुढचं नाक तुटलेलं स्पष्ट दिसतंय आणि आजूबाजूला बचाव पथकांचे कर्मचारी दिसत आहेत.

या दुर्घटनेत किती जीवितहानी झाली, याची अधिकृत माहिती अजून आलेली नाही. पण सोशल मीडियावर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, दोन जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं म्हटलं जातंय. सध्या या घटनेची चौकशी सुरू झाली आहे.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

टॅक्सीवेवर झाली ही धडक

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान एअर कॅनडा एक्सप्रेसचं फ्लाईट AC8646 होतं. बॉम्बार्डियर CRJ-900 प्रकारचं हे विमान जॅझ एव्हिएशन (Jazz Aviation) कंपनी चालवत होती. हे विमान रनवे 4/22 जवळच्या टॅक्सीवेवरून जात असताना एअरपोर्टच्या फायर ट्रकला धडकलं.

घटनास्थळावरून आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचं नाक आणि पुढच्या भागाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. यावरून धडक किती जोरदार होती याचा अंदाज येतो. घटनेनंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.

या घटनेच्या काही क्षण आधीचं एअर ट्रॅफिक कंट्रोलचं (ATC) रेकॉर्डिंगही समोर आलं आहे. यात ATC अधिकारी फायर ट्रकला 'थांबा, थांबा' अशा सूचना देत असल्याचं ऐकू येतंय. याचवेळी एका डेल्टा विमानाला लँडिंग करण्यापासून रोखण्यात आलं.

Scroll to load tweet…

बचावकार्य आणि एअरपोर्ट बंद

या घटनेनंतर, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी LaGuardia एअरपोर्टवरील सर्व उड्डाणं थांबवली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) याला 'ग्राउंड स्टॉप' म्हटलं आहे. FAA ने उड्डाणं थांबवण्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही, पण हा आदेश आणखी वाढण्याची शक्यता 'जास्त' असल्याचं म्हटलं आहे.

Scroll to load tweet…

रिपोर्ट्सनुसार, बचाव पथकांनी तातडीने संपूर्ण टॅक्सीवेवर धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेऊन विमानातल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. आता नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि FAA मिळून या धडकेची चौकशी करतील. अधिकारी त्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संवाद, विमानाची स्थिती आणि एअरपोर्टवरील वाहनांची पोझिशन या सगळ्या गोष्टी तपासतील. ही दुर्घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिकेतील एअरपोर्ट्सवर कर्मचाऱ्यांची, विशेषतः ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे.