भारतातील इराणच्या दूतावासाने इराणच्या पुनर्बांधणीसाठी पैसे आणि दागिने दान करणाऱ्या भारतीयांचे आभार मानले आहेत. विशेषतः काश्मीरमधील लोकांनी दाखवलेल्या भावनिक पाठिंब्याबद्दल दूतावासाने त्यांचे कौतुक केले.
भारतातील इराणच्या दूतावासाने शनिवारी इराणच्या पुनर्बांधणीसाठी पैसे आणि दागिने दान करणाऱ्या भारतीयांच्या 'दयाळूपणा' आणि 'माणुसकी'बद्दल त्यांचे आभार मानले. दूतावासाने म्हटले आहे की, भारताची ही मदत ते कायम लक्षात ठेवतील. दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “तुमची दया आणि माणुसकी आम्ही कधीच विसरणार नाही. धन्यवाद, भारत.” तुमची दया आणि माणुसकी आम्ही कधीच विसरणार नाही. धन्यवाद, भारत. https://t.co/hiYnIEfN3D — Iran in India (@Iran_in_India) March 22, 2026
काश्मीरच्या लोकांनी जिंकली मनं
"इराणच्या लोकांना दिलेल्या मानवतावादी मदतीबद्दल आणि भावनिक पाठिंब्याबद्दल आम्ही काश्मीरच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. ही मदत कधीही विसरली जाणार नाही. धन्यवाद, भारत," असेही दूतावासाने म्हटले आहे. इराणच्या लोकांना दिलेल्या मानवतावादी मदतीबद्दल आणि भावनिक पाठिंब्याबद्दल आम्ही काश्मीरच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. ही मदत कधीही विसरली जाणार नाही. धन्यवाद, भारत. https://t.co/6rEyYEfjHu — Iran in India (@Iran_in_India) March 22, 2026
मदत करताना डोळे पाणावले
दूतावासाने एका महिलेच्या त्यागाचा विशेष उल्लेख केला, जिने २८ वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या पतीची आठवण म्हणून जपून ठेवलेले दागिने दान केले. "काश्मीरमधील एका आदरणीय बहिणीने २८ वर्षांपूर्वी निधन झालेल्या पतीची आठवण म्हणून जपून ठेवलेले सोने इराणच्या लोकांसाठी प्रेमाने आणि सहानुभूतीने दान केले. तुमचे अश्रू आणि तुमच्या भावना आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहेत आणि हे आम्ही कधीही विसरणार नाही. धन्यवाद, काश्मीर. धन्यवाद, भारत."
काश्मीरमधील एका आदरणीय बहिणीने २८ वर्षांपूर्वी निधन झालेल्या पतीची आठवण म्हणून जपून ठेवलेले सोने इराणच्या लोकांसाठी प्रेमाने आणि सहानुभूतीने दान केले. https://t.co/0zFcJwGhj0 — Iran in India (@Iran_in_India) March 22, 2026
दूतावासाने पुढे म्हटले, "अगदी काश्मीरमधील लहान मुलंही इराणसाठी आपली पिगी बँक (पैशांचा गल्ला) भेट म्हणून देत आहेत. देव तुमचं भलं करो."
अगदी काश्मीरमधील लहान मुलंही इराणसाठी आपली पिगी बँक भेट म्हणून देत आहेत. देव तुमचं भलं करो. pic.twitter.com/OfI6w4rNUb — Iran in India (@Iran_in_India) March 22, 2026
बुडगाममध्ये देणगीसाठी पुढाकार
आखाती युद्धाच्या संकटानंतर इराणला पाठिंबा देण्यासाठी बुडगाममधील स्थानिकांनी सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान केली आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बुडगामचे मोहसिन अली म्हणाले, "मस्जिद इमाम जमानमध्ये आम्ही देणगी गोळा करण्यासाठी एक स्टॉल लावला आहे."
मोहसिन अली यांनी सांगितले, “आमच्या माता-भगिनी दागिने, तांब्याची भांडी आणि रोख रक्कम दान करत आहेत, जेणेकरून आम्ही इराणला या कठीण परिस्थितीत मदत करू शकू.” ते म्हणाले की, "आम्ही स्वतः इराणला जाऊन मदत करू शकत नाही, पण किमान आर्थिक मदत करून माणुसकीची सेवा नक्कीच करू शकतो." (ANI)


