सार

दक्षिण आफ्रिका संघातील माजी क्रिकेटर एबी डेव्हिलियर्सने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा आई-बाबा होणार असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. याच विधानावरुन आता एबी डेव्हिलियर्सने माफी मागितली आहे.

AB de Villiers' shock U-turn on Virat Kohli's 2nd-child reveal :  भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) स्टार क्रिकेटर विराट कोहली इंग्लंड (England) विरोधात होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिजच्या अखेरची टेस्ट मॅच खेळणार आहे की नाही याबद्दलचा सस्पेंस अद्याप कायम आहे. सीरिजच्या पहिल्या दोन टॅस्ट मॅचमधून विराह कोहलीने ब्रेक घेतला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनलवरुन (YouTube Channel) विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय सध्या तो आपल्या परिवारासोबत वेळ घालवत असल्याचेही डिव्हिलियर्सने म्हटले होते. या विधानावरुनच डिव्हिलयर्सने युटर्न घेतला असून त्याने माफी मागितली आहे.

एबी डिव्हिलियर्सने म्हटले की, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. विराट कोहलीबद्दल जे काही विधान केले होते ते चुकीचे होते. विराटने ब्रेक घेतल्यानंतर अशी बातमी आली होती की, त्याची आई आजारी आहे. यामुळेच विराटने क्रिकेटच्या सामन्यातून ब्रेक घेतला आहे. पण नंतर विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा देत पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते.

एबी डिव्हिलियर्सने मागितली माफी आणि म्हणाला.…
एबी डिव्हिलियर्सने दैनिक भास्कर यांच्याशी बोलताना म्हटले की, "क्रिकेट नंतर येते, सर्वप्रथम फॅमिली येते. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी जी काही माहिती दिली ती चुकीची होती. विराट कोहलीला खेळादरम्यान ब्रेक घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. फॅमिली आधी येते आणि नंतर क्रिकेट. विराट कोहली परिवारासोबत आहे. सध्या तो कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. विराट कोहलीच्या जगभरातील चाहत्यांनी तो जेथे कुठे आहे त्याच्यासाठी प्रार्थना करावी. विराट कोहलीचे ब्रेक घेण्यामागील जे काही कारण असेल, पण मी अपेक्षा करतो तो पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानवर परत येईल."

भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना
भारत विरुद्ध इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या सीरिजमधील तिसरी टेस्ट मॅच राजकोट येथे 15 फेब्रुवारीला खेळवली जाणार आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी अद्याप भारतीय संघातून कोणते खेळाडू खेळणार याची घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : 

अमेरिका चंद्र मोहिमेसाठी सज्ज, 14 फेब्रुवारीला लाँच होणार मिशन

अयोध्येनंतर UAE मधील भव्य हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया