शाओमी आपली नवीन Xiaomi 18 Pro सिरीज २३ सप्टेंबरला चीनमध्ये लाँच करणार आहे. यात 'व्हर्सटाईल बॅक स्क्रीन' आणि ४००० निट्सचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा फोन डिसेंबरमध्ये भारतात येण्याची शक्यता आहे.
मुंबई : टेक जायंट शाओमी (Xiaomi) आपली नवीन Xiaomi 18 Pro सिरीज या आठवड्याच्या शेवटी चीनमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने नुकतीच याची घोषणा केली. या सिरीजमध्ये दोन मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. कंपनीने फोनची डिझाईन, कलर्स आणि फीचर्सचे टीझर्स शेअर करायला सुरुवात केली आहे. हा फोन किमान तीन रंगांमध्ये मिळेल, ज्यात एका नव्या निळ्या रंगाचा समावेश आहे. याशिवाय, सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा (Samsung Galaxy S26 Ultra) प्रमाणेच यात हार्डवेअर-बेस्ड प्रायव्हसी डिस्प्ले फीचर सुद्धा मिळणार आहे.
२३ सप्टेंबरला लाँच होणार Xiaomi 18 Pro सिरीज
शाओमीने चायनीज मायक्रोब्लॉगिंग साईट वेईबोवर (Weibo) एक पोस्ट शेअर केली आहे. यानुसार, Xiaomi 18 Pro सिरीज २३ सप्टेंबरला चीनमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता) लाँच होईल. म्हणजेच लाँचिंगला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. या लाईनअपमध्ये Xiaomi 18 Pro आणि Xiaomi 18 Pro Max असे दोन फोन्स असू शकतात. हे दोन्ही फोन्स ब्लॅक, स्टारी रिव्हर ब्लू आणि व्हाईट अशा तीन रंगांमध्ये येण्याची शक्यता आहे.
डिझाईनच्या बाबतीत हा फोन मागच्या मॉडेलसारखाच दिसतो. गेल्या वर्षीप्रमाणेच या फोनच्या मागेही एक सेकंडरी डिस्प्ले असेल, हे आता स्पष्ट झालंय. शाओमी या नव्या बॅक डिस्प्लेला 'व्हर्सटाईल बॅक स्क्रीन' (Versatile Back Screen) म्हणत आहे, ज्यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतील. या फोनच्या बाजूला 'मायक्रो-आर्क क्वाड-कर्व्हड' ॲल्युमिनियम फ्रेम असेल. तसेच, पुढच्या बाजूला टचस्क्रीनभोवती फक्त ०.९९ मिमी जाडीचे बेझल्स असतील.
याशिवाय, कंपनीने Xiaomi 18 Pro सिरीजच्या डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन्सही उघड केले आहेत. Xiaomi 18 Pro मध्ये RGB लॉसलेस ॲरेसह फ्लॅट AMOLED डिस्प्ले मिळेल. यात नेक्स्ट-जनरेशन M11 ल्युमिनेसेंट मटेरियल आणि नवीन ग्रीन लाईट-एमिटिंग मटेरियल्स वापरले आहेत. यामुळे याची प्रकाश क्षमता २० टक्क्यांनी वाढली असून, यात ४,००० निट्सचा कमाल ब्राइटनेस मिळेल. शाओमीच्या दाव्यानुसार, हा डिस्प्ले 1.5K रिझोल्यूशन स्क्रीनइतकीच बॅटरी वापरेल, पण 2K रिझोल्यूशन डिस्प्लेसारखीच क्लॅरिटी देईल.
सॅमसंगच्या प्रायव्हसी डिस्प्ले टेक्नॉलॉजीसारखंच काम करणारं हे नवीन हार्डवेअर-लेव्हल प्रायव्हसी डिस्प्ले फीचर या आठवड्यात Xiaomi 18 Pro सिरीजसोबत लाँच केलं जाईल.
Xiaomi 18 Pro भारतात कधी येणार?
प्रसिद्ध टिपस्टर देबयान रॉय (@Gadgetsdata) यांनी Xiaomi 18 सिरीजच्या भारतातील लाँचिंगबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ही सिरीज या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते. विशेष म्हणजे, कंपनीने गेल्या वर्षी भारतात प्रो मॉडेल्स लाँच केले नव्हते. शिवाय, शाओमीने अद्याप या लाँच टाईमलाईनला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे, ही माहिती सध्या तरी फक्त एक अफवा मानूनच चालावी लागेल.


