- Home
- Utility News
- कमी किंमतीत मिळणार टॉपचा फोन, ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५ जी सपोर्टचे हे आहेत स्मार्टफोन्स
कमी किंमतीत मिळणार टॉपचा फोन, ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५ जी सपोर्टचे हे आहेत स्मार्टफोन्स
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात अनेक बजेट-फ्रेंडली ५जी पर्याय उपलब्ध आहेत. या लेखात POCO, मोटोरोला, सॅमसंग आणि Ai+ Nova सारख्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे.

कमी किंमतीत मिळणार टॉपचा फोन, ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५ जी सपोर्टचे हे आहेत स्मार्टफोन्स
स्मार्टफोन घेण्याचा आपण या महिन्यात विचार करत असाल तर बजेटमध्ये ५जी फोन आपल्याला मिळू शकतात. आता ऑफरमध्ये आपल्याला कमी किंमतीमध्ये फोन मिळणार आहे.
POCO C75 5G:
५जी सपोर्ट व्यतिरिक्त फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ५१६० mAh बॅटरी आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा कंपनीकडून देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये फ्लिपकार्टवर हा फोन ७,४९९ रुपयांना मिळणार आहे.
MOTOROLA G35 5G
MOTOROLA G35 5G हा फोन अगदी स्वस्तात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा हा फोन ९,९९९ रुपयांना विकला जाणार आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी, युनिसॉक टी760 प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा, 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 6.72-इंच फुल एचडी+ डिस्प्ले असेल.
Samsung Galaxy F06 5G
Samsung Galaxy F06 5G हा फोन सॅमसंगचा एकदम परवडणारा फोन म्हणून खासकरून ओळखला जातो. हा फोन ६,४९९ रुपयांना उपलब्ध झाला असून हा फोन ५ जी असणार आहे. हा हँडसेट 50-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा, 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 5000 एमएएच बॅटरी, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि 6.7-इंच एचडी+ डिस्प्लेसह येतो.
Ai+ Nova 5G
५जी सपोर्ट असणारा हा फोन फ्लिपकार्टवर ८,९९९ रुपयांना मिळणार आहे. या किंमतीत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. 5जी व्यतिरिक्त, या हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल एआय ड्युअल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 6.7-इंच एचडी+ डिस्प्ले आणि युनिसॉक टी8200 प्रोसेसर देखील आहे.
REDMI 14C 5G
हा रेडमीचा फोन असून तो ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा हा फोन ९८४५ रुपयांना मिळणार आहे. हा फोन 6.8-इंच एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 प्रोसेसर, 5160 एमएएच बॅटरी, 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा आणि 18 वॅट फास्ट चार्जिंग सारख्या फीचर्ससह येतो.

