तुमचा इंटरनेट डेटा ऑन असूनही, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणाऱ्याला फक्त सिंगल टिक दिसावी असं वाटतंय? व्हॉट्सॲपच्या प्रॉक्सी सेटिंगमध्ये एक छोटा बदल करून तुम्ही ऑनलाइन असूनही ऑफलाइन असल्यासारखं दाखवू शकता आणि आपलं ऑनलाइन स्टेटस लपवू शकता.
आजकाल इंटरनेटशिवाय जगणं म्हणजे जवळजवळ अशक्यच झालं आहे. एकवेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय एक क्षणही करमत नाही, अशी बऱ्याच जणांची अवस्था आहे. इंटरनेट जरा जरी बंद पडलं, तरी अनेकांचा जीव कासावीस होतो. इतके आपण सगळे फोन आणि इंटरनेटच्या आहारी गेलो आहोत.
व्हॉट्सॲपवर सिंगल टिक कशी ठेवायची?
अनेकदा आपण एखादा व्हिडीओ बघत असतो किंवा व्हॉट्सॲपवर दुसऱ्याच कुणाशीतरी बोलत असतो, तेव्हा इंटरनेट चालू ठेवावंच लागतं. अशावेळी जर कुणी आपल्याला व्हॉट्सॲपवर मेसेज केला, तर त्याला लगेच डबल टिक दिसते. यावरून तुम्ही ऑनलाइन आहात हे समोरच्याला कळतं. आता मेसेज वाचला हे कळू नये म्हणून अनेकजण ब्लू टिक बंद करतात, आपलं 'लास्ट सीन' पण लपवतात. असे अनेक 'चोर' आपल्या आजूबाजूला असतात.
तुम्हीही हे करून बघा
पण हे सगळं करूनही, डबल टिक दिसली की आपलं इंटरनेट चालू आहे हे समोरच्याला कळतंच आणि आपण पकडले जातो. 'अरे यार, यावर काही उपाय नाही का?' असं तुम्हाला वाटत असेल, तर काळजी करू नका. कारण मोबाईल कंपन्यांनी तुमच्या अशा 'लपाछपी'साठी जवळपास सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत.
तर मग, इंटरनेट चालू असतानाही, तुम्हाला मेसेज करणाऱ्याला फक्त सिंगल टिक दिसावी आणि तुम्ही नेट बंद केलंय असं त्याला वाटावं, यासाठी एक सोपी ट्रिक आहे. हो, हे शक्य आहे!
त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचंय...
- पहिल्यांदा आपलं व्हॉट्सॲप उघडा.
- उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- 'सेटिंग्ज' (Settings) मध्ये जा.
- खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 'स्टोरेज अँड डेटा' (Storage and data) दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर 'प्रॉक्सी' (Proxy) ऑप्शनवर क्लिक करा.
- 'यूज प्रॉक्सी' (Use Proxy) जर बंद असेल, तर ते ऑन करा.
- त्याखाली तुम्हाला एक नंबर दिसेल. तिथे 1.1.1.1 असं रिटाइप करा.
- खाली असलेल्या बरोबरच्या चिन्हावर (✓) किंवा 'सेव्ह' (Save) वर क्लिक करा.
- तुमचं काम झाल्यावर परत डबल टिक हवी असेल, तर 'यूज प्रॉक्सी' पुन्हा ऑन करा. असं केल्यावर 1.1.1.443 हा ऑप्शन आपोआप चालू होईल.


