सणासुदीच्या काळात ह्युंदाईने त्यांच्या ग्रँड आय१० निओस (Grand i10 Nios) कारवर तब्बल ७५,००० रुपयांपर्यंतच्या भन्नाट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यात कॅश डिस्काउंट, नवरात्री बुकिंग बोनस आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. सीएनजी व्हेरियंटवरही खास सूट मिळत असून, ६ एअरबॅग्ससह ही कार सुरक्षेच्या बाबतीतही एकदम भारी आहे.
सणासुदीचा काळ सुरू झालाय आणि गाड्यांच्या बाजारात ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. ह्युंदाई इंडियाने (Hyundai India) त्यांच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक 'ग्रँड आय१० निओस'वर (Grand i10 Nios) या महिन्यात जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. ग्राहकांना या कारवर तब्बल ७५,००० रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.६० लाख ते ७.८३ लाख रुपयांच्या घरात आहे. कंपनीने कॅश डिस्काउंट, नवरात्री बुकिंग बोनस, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस आणि अपग्रेड ऑफर असे अनेक फायदे दिले आहेत.
अशा आहेत ऑफर्स
ह्युंदाई या कारवर २०,००० रुपयांचा थेट कॅश डिस्काउंट देत आहे. याशिवाय १५,००० रुपयांचा नवरात्री बुकिंग बोनसही मिळतोय. जर तुम्ही जुनी गाडी एक्सचेंज करत असाल, तर १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. जुनी गाडी स्क्रॅप करायची असेल, तर २०,००० रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बोनसही कंपनी देत आहे. यासोबतच १५,००० रुपयांची अतिरिक्त अपग्रेड ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पात्र ग्राहकांसाठी ५,००० रुपयांची खास सवलतही उपलब्ध आहे.
सीएनजी व्हेरियंटवरही मोठी सूट
ग्रँड आय१० निओसच्या सीएनजी (CNG) मॉडेलवरही ह्युंदाईने खास ऑफर्स दिल्या आहेत. या व्हेरियंटवर ग्राहकांना ७०,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. ग्राहक त्यांच्या पात्रतेनुसार एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनसची निवड करू शकतात.
८३ पीएस पॉवरची ताकद
या कारमध्ये १.२ लिटर कप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन ८३ पीएस (PS) ची पॉवर आणि ११३.८ एनएम (Nm) चा पीक टॉर्क जनरेट करतं. ही गाडी ५-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो एएमटी (AMT) गिअरबॉक्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
फीचर्सच्या बाबतीतही एकदम भारी
गाडीमध्ये फुटवेल लायटिंग, टाईप-सी फ्रंट यूएसबी चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सारखे भन्नाट फीचर्स आहेत. सोबतच ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमही मिळते. मागच्या प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, रिअर पॉवर आउटलेट आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारख्या सुविधाही या कारमध्ये आहेत.
सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स
सुरक्षेच्या बाबतीतही ग्रँड आय१० निओसने कोणतीही तडजोड केलेली नाही. गाडीत ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखे सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय क्रूझ कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे.
अनेक रंगांचे पर्याय
ही कार टायटन ग्रे, पोलर व्हाईट, फायरी रेड, टायफून सिल्व्हर, स्पार्क ग्रीन आणि टील ब्लू अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. पोलर व्हाईट आणि स्पार्क ग्रीन रंगांसोबत फॅंटम ब्लॅक रूफ असलेले ड्युअल-टोन पर्यायही मिळतात. सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर किंमत आणि ऑफर्स पाहता ग्रँड आय१० निओस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
टीप: वर दिलेल्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सची माहिती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून घेतली आहे. हे डिस्काउंट्स राज्य, शहर, डीलरशिप, स्टॉक, गाडीचा रंग आणि व्हेरियंटनुसार बदलू शकतात. म्हणजेच तुमच्या शहरातील डीलरकडे ही सूट कमी किंवा जास्त असू शकते. त्यामुळे गाडी बुक करण्यापूर्वी अचूक ऑफर्स आणि इतर माहितीसाठी तुमच्या जवळच्या ह्युंदाई डीलरशिपशी नक्की संपर्क साधा.
