या ४ आयडिया व्यायाम करायला करतील प्रेरित, एक वाचून तर आजच व्हाल ठणठणीत
दररोज व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळवणे कठीण असू शकते. हा लेख तुम्हाला व्यायामात सातत्य ठेवण्यासाठी काही सोप्या आयडिया देतो, जसे की किमान १५ मिनिटे हालचाल करणे, आवडीचा व्यायाम निवडणे आणि व्यायामाला वजनाशी न जोडणे.

या ४ आयडिया व्यायाम करायला करतील प्रेरित, एक वाचून तर आजच व्हाल ठणठणीत
आपल्याला दररोज सकाळी व्यायाम करायची इच्छा असल्यास हि सर्वात चांगली सवय मानली जाते. या दररोजच्या जगण्यात आपला उत्साह टिकवून ठेवणं सर्वात जास्त कठीण जात असत.
१५ मिनिटांची तरी हालचाल करा
आपण कमीत कमी १५ मिनिट तरी दररोज व्यायाम करायला हवा. आपण जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ व्यायाम करायला हवा. जास्तीत जास्त वेळ हालचाल केल्यावर आपला व्यायाम होऊन जातो.
व्यायामाला वजनाशी जोडू नका
अनेक लोक हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असतात. वजन काट्यावरचा आकडा बदलला नाही कि लोकांचा उत्साह कमी होत जातो. त्यामुळं वजन आणि व्यायाम या दोन्हीचा संबंध जोडू नका.
आपल्याला जो आवडतो तो व्यायाम करा
आपल्याला जो आवडतो तो व्यायाम करायला सुरुवात करा. आपण निसर्गात जा, स्विमिंग करा किंवा बॅडमिंटन खेळायला जा. हे सर्व व्यायाम केल्यावर आपल्या शरीराची तंदुरुस्ती टिकून राहत जाते.
व्यायामाचे कारण शोधून काढा
आपल्याला दररोज जर जिमला जायचं असेल तर तिथं का जायचं हे कारण माहित असायला हवं. तुम्ही जर रोज स्वतःला मोटिव्हेट केलं तर तुम्हाला पुढं जाण्यापासून कोणच रोखू शकत नाही.
व्यायामात सातत्य ठेवा
आपण सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायामात सातत्य ठेवायला हवं. ते ठेवलं तरच व्यायाम करणं हे सोपं होऊन जात. त्यामुळं सातत्य ठेवण्याचा आवर्जून प्रयत्न करा.

