मारुती सुझुकी आणि टोयोटा लवकरच भारतीय मार्केटमध्ये आपल्या नवीन ७-सीटर कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यात अर्टिगा फेसलिफ्ट, नवीन फॉर्च्युनर, ग्रँड विटारा ७-सीटर, कोरोला क्रॉस आणि एका इलेक्ट्रिक एमपीव्हीचा समावेश आहे.
मुंबई : मारुती आणि टोयोटा लवकरच भारतात नवीन ७-सीटर कार्स लाँच करणार आहेत. या कार्समध्ये तुम्हाला एकदम भारी फीचर्स आणि नवीन लूक पाहायला मिळेल. या लिस्टमध्ये अर्टिगा फेसलिफ्ट आणि कोरोला क्रॉससारख्या गाड्यांचाही समावेश आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा अर्टिगा फेसलिफ्टसह अनेक नवीन ७-सीटर कार्स बाजारात आणत आहेत.
मारुती सुझुकी आणि टोयोटा येत्या काळात भारतीय कार मार्केटमध्ये नवीन ७-सीटर गाड्या आणण्याच्या तयारीत आहेत. यात नेक्स्ट जनरेशन फॉर्च्युनर, अर्टिगा फेसलिफ्ट आणि ७-सीटर ग्रँड विटारा या गाड्यांचा समावेश आहे. या नवीन कार्समध्ये ग्राहकांना अनेक भन्नाट फीचर्स आणि नवीन अपडेट्स मिळतील.
मारुती सुझुकी YMC
मारुती सुझुकी YMC हा कंपनीच्या आगामी थ्री-रो (तीन रांगा असलेल्या) इलेक्ट्रिक MPV चा कोडनेम आहे. ही कार सुझुकी आणि टोयोटाच्या HEARTECT-e प्लॅटफॉर्मवर बनवली जाणार आहे. यात 49kWh आणि 61.1kWh असे दोन बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार ५४३ किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. एप्रिल २०२७ मध्ये YMC भारतात लाँच होऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत १४ लाख ते १८ लाख रुपयांच्या घरात असू शकते.
नवीन टोयोटा फॉर्च्युनर
टोयोटाची नेक्स्ट जनरेशन फॉर्च्युनर २०२७ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. तर या वर्षाच्या अखेरीस ती ग्लोबल मार्केटमध्ये सादर केली जाईल. नवीन फॉर्च्युनर अपडेटेड प्लॅटफॉर्मवर बनवली जात आहे. यात 48V माईल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजी असलेलं सध्याचं २.८ लिटर टर्बो-डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं. तसंच २.७ लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिनही कायम राहण्याची शक्यता आहे. या कारची किंमत ३८ लाख ते ५५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
मारुती ७-सीटर ग्रँड विटारा
मारुती सुझुकी सध्या ग्रँड विटाराच्या ७-सीटर व्हर्जनवर काम करत आहे. याला Y17 असं कोडनेम देण्यात आलंय. ही कार २०२७ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. यात ग्राहकांना ६-सीटर आणि ७-सीटर असे दोन्ही पर्याय मिळतील. या कारची किंमत १३ लाख ते २३ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. यात सध्याचे १.५ लिटर माईल्ड-हायब्रिड आणि स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिनचे पर्याय कायम राहतील. याशिवाय, मॅन्युअल माईल्ड-हायब्रिड व्हर्जनमध्ये AllGrip AWD चा पर्यायही मिळू शकतो.
मारुती अर्टिगा फेसलिफ्ट
मारुती सुझुकी अर्टिगा फेसलिफ्ट २०२६ च्या अखेरीस किंवा फेब्रुवारी २०२७ च्या दरम्यान लाँच होऊ शकते. यात नवीन ग्रिल, स्लिम एलईडी हेडलाईट्स, नवीन DRLs, अपडेटेड बंपर आणि नवीन १६-इंचाचे अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. केबिनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे यात ९-इंचाची SmartPlay Pro+ टचस्क्रीन दिली जाऊ शकते. तसंच वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टही मिळेल. इंजिनमध्ये मात्र कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही.
टोयोटा कोरोला क्रॉस
टोयोटा कोरोला क्रॉस २०२८ किंवा २०२९ च्या सुरुवातीला भारतात एन्ट्री करू शकते. ही एक प्रीमियम ७-सीटर एसयूव्ही असेल, जी ६ आणि ७-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. यात पॅनोरमिक सनरूफ, पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड टेलगेट यांसारखे फीचर्स मिळतील. यात २.० लिटर स्ट्रॉंग-हायब्रिड आणि नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. याचं हायब्रिड व्हर्जन सुमारे 184 ते 196 bhp पॉवर जनरेट करेल असा अंदाज आहे.


