MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Honda QC3 : 145 किमी रेंज आणि भरपूर स्पेस... जाणून घ्या नव्या होंडा ई-स्कूटरची किंमत आणि फीचर्स

Honda QC3 : 145 किमी रेंज आणि भरपूर स्पेस... जाणून घ्या नव्या होंडा ई-स्कूटरची किंमत आणि फीचर्स

Honda QC3: होंडाने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर १४५ किमीपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे. ३२ लिटरची मोठी डिक्की आणि फॅमिलीसाठी खास फीचर्स असलेल्या या स्कूटरची माहिती जाणून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 23 2026, 10:57 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
होंडा क्यूसी3 इलेक्ट्रिक स्कूटर
Image Credit : Honda

होंडा क्यूसी3 इलेक्ट्रिक स्कूटर

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वेगाने वाढत आहे. हेच लक्षात घेऊन होंडाने फॅमिलीसाठी खास 'QC3' ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. दिल्लीत या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.३५ लाख रुपये निश्चित केली आहे. या स्कूटरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात ३ kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर १४५ किमीपर्यंत धावेल, असा दावा होंडाने केला आहे. सध्या भारतात होंडाच्या जेवढ्या ई-स्कूटर्स आहेत, त्यात QC3 ची रेंज सर्वात जास्त आहे. तुम्ही ५,००० रुपये टोकन अमाऊंट देऊन या स्कूटरचं बुकिंग करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
होंडाची नवीन स्कूटर
Image Credit : Honda

होंडाची नवीन स्कूटर

तुम्ही होंडाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा निवडक 'रेडविंग' (Redwing) डीलरशिप्सवर जाऊन या स्कूटरचं बुकिंग करू शकता. पण सध्या देशभरात याची विक्री सुरू झालेली नाही. पहिल्या टप्प्यात फक्त दिल्ली, आग्रा, कटक, सुरत आणि कोल्लम या पाच शहरांमधील निवडक शोरूम्समध्येच ही स्कूटर उपलब्ध असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्येही याची विक्री सुरू होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Related Articles

Related image1
Top 10 Best Selling Scooters In India August 2026 : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 स्कूटर्स
Related image2
Electric Scooters : स्टोरेज आणि मायलेजमध्ये एकदम भारी... देशातील टॉप 5 ई-स्कूटर्स
36
३२ लिटरची मोठी डिक्की
Image Credit : Honda

३२ लिटरची मोठी डिक्की

होंडाने QC3 स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यात ग्रे, व्हाईट, लाईट ब्लू आणि डार्क ब्लू या रंगांचा समावेश आहे. फॅमिलीचा विचार करून डिझाईन केल्यामुळे, रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या सोयीसुविधांवर कंपनीने जास्त भर दिला आहे. विशेषतः सीटखाली दिलेली ३२ लिटरची मोठी डिक्की कुटुंबासाठी खूप फायदेशीर ठरेल.

46
Honda ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Image Credit : Honda

Honda ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

होंडा QC3 मध्ये ३ kWh क्षमतेची फिक्स्ड बॅटरी दिली आहे. या बॅटरीच्या जोरावर स्कूटर १४५ किमीची रेंज देते. बॅटरी ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे २ तास ४० मिनिटे लागतात, तर फुल चार्ज होण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो. चालकाला सर्व माहिती मिळावी यासाठी यात ५ इंचांचा टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे. याशिवाय मोबाईल कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि कीलेस एंट्री (चावीशिवाय सुरू करण्याची सुविधा) असे भन्नाट फीचर्स यात आहेत. कॉल्स आणि मेसेजेसचे अलर्ट्सही तुम्हाला स्कूटरच्या स्क्रीनवर पाहता येतील.

56
टीव्हीएस आयक्यूबला देणार टक्कर
Image Credit : Honda

टीव्हीएस आयक्यूबला देणार टक्कर

रोजच्या वापराचा विचार केल्यास, ३२ लिटरची डिक्की हा या स्कूटरचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. ऑफिसला जाणं, बाजारातून सामान आणणं किंवा फॅमिलीसोबत फिरणं, या सर्व गोष्टींसाठी ही स्पेस खूप उपयोगी पडेल. किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत होंडा QC3 ची थेट टक्कर टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक, एथर रिझ्टा आणि विडा या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होईल. होंडाच्या सध्याच्या ई-स्कूटर्सशी तुलना केली, तर QC3 सर्वात जास्त रेंज देणारं मॉडेल ठरलं आहे.

66
घरीच चार्ज करण्याची सुविधा
Image Credit : Honda

घरीच चार्ज करण्याची सुविधा

ज्यांना घरीच स्कूटर चार्ज करायची आहे, त्यांच्यासाठी ही स्कूटर खूप सोयीची आहे. पण सध्या फक्त पाच शहरांमध्येच याची विक्री सुरू झाल्यामुळे, इतर शहरातील ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागेल. १४५ किमीची रेंज, ३२ लिटरची डिक्की, फॅमिलीसाठी उपयुक्त फीचर्स आणि होंडाचा विश्वास, या सर्व गोष्टी एकाच स्कूटरमध्ये देण्याचा प्रयत्न कंपनीने QC3 च्या माध्यमातून केला आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bank Nominee Rules : खातेदार आणि नॉमिनी दोघांचाही मृत्यू झाल्यास बँकेतले पैसे कोणाला मिळतात?
Recommended image2
Road Safety Signs : रस्त्यावर हा सिम्बॉल कधी पाहिलाय का? दिसल्यास खूप सावध राहा
Recommended image3
Google DeepMind Job : डिग्रीची गरज नाही, पगार 10 कोटी; गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय हवंय?
Recommended image4
ChatGPT Prompts : नवरात्रीत तुमचे फोटो दुर्गा पूजा पंडाल, फेस्टिव्ह लूक, बंगाली साडीमध्ये कसे बदलायचे?
Recommended image5
FASTag : जुनी कार विकलीये? मग लगेच फास्टॅग बंद करा, नाहीतर बँक खातं रिकामं होईल
Related Stories
Recommended image1
Top 10 Best Selling Scooters In India August 2026 : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 स्कूटर्स
Recommended image2
Electric Scooters : स्टोरेज आणि मायलेजमध्ये एकदम भारी... देशातील टॉप 5 ई-स्कूटर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved