MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Second Hand Car : इंजिनपासून टायरपर्यंत... जुनी कार घेण्यापूर्वी या 7 गोष्टी नक्की तपासा

Second Hand Car : इंजिनपासून टायरपर्यंत... जुनी कार घेण्यापूर्वी या 7 गोष्टी नक्की तपासा

तुम्ही सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय का? फसवणूक टाळण्यासाठी इंजिन, टायर आणि कागदपत्रांची तपासणी कशी करावी?

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 07 2026, 03:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
सेकंड हँड कार घेताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
Image Credit : X

सेकंड हँड कार घेताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

भारतात हल्ली सेकंड हँड गाड्या घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नवीन गाड्यांच्या किमती वाढल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे नवीन कार घेण्याऐवजी जुनी कार कमी किमतीत घेणे पसंत करतात. कमी किंमत आणि कार लवकर सेट होते, यामुळे या ट्रेंडला चांगलीच पसंती मिळतेय. तुम्हीही जुनी कार घेण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
तुमच्या गरजांची यादी
Image Credit : X

तुमच्या गरजांची यादी

कार घेण्यापूर्वी तुमची नेमकी गरज काय आहे, हे आधी ठरवा. कुटुंबातील सदस्यांची संख्या, कार घेण्याचे कारण, गाडी कुठे जास्त चालणार आणि तुमचे बजेट निश्चित करा. तुम्ही कारवर किती खर्च करू शकता आणि तुम्हाला कोणते फीचर्स हवे आहेत, याचा विचार करा. यावरून तुम्हाला LUV, MUV, SUV किंवा कॉम्पॅक्ट SUV पैकी कोणती कार हवी आहे, हे ठरवणे सोपे जाईल.

Related Articles

Related image1
Upcoming 7 Seater Cars : मारुती आणि टोयोटा आणतायत 5 भन्नाट 7-सीटर कार्स
Related image2
Top Selling Cars : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या? लोक याच कार्स का खरेदी करतात?
37
कारची तपासणी
Image Credit : Asianet News

कारची तपासणी

सेकंड हँड कार नेहमीच नवीन कारसारखी नसते. मालकाने ती व्यवस्थित मेंटेन केली असेलच असे नाही. त्यामुळे शक्यतो चांगली मेंटेन केलेली कारच निवडा. गरज वाटल्यास कारची चांगली माहिती असलेल्या मित्राला सोबत घेऊन जा. १० वर्षांपेक्षा जुन्या गाड्या घेणे टाळा, कारण त्यांचा मेंटेनन्स खर्च जास्त असतो. शक्यतो सिंगल ओनर (Single Owner) असलेली कार घेण्याला प्राधान्य द्या.

47
इंजिनची तपासणी
Image Credit : Asianet News

इंजिनची तपासणी

सेकंड हँड कार घेताना तिचे इंजिन तपासणे सर्वात महत्त्वाचे असते. कार किती चालली आहे, हे कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासा. खरेदीच्या तारखेपर्यंतचे सर्व्हिस रेकॉर्ड मागा आणि इंजिनचे काही काम झाले आहे का, याची माहिती घ्या. इंजिन चांगले असेल तरच तुमची गुंतवणूक योग्य ठरेल आणि तुम्ही ती कार जास्त काळ वापरू शकाल.

57
स्पीडोमीटर तपासणी (Odometer Check)
Image Credit : X

स्पीडोमीटर तपासणी (Odometer Check)

या तपासणीतून कार किती किलोमीटर चालली आहे, हे समजते. खरंतर कारची किंमत याच गोष्टीवर अवलंबून असते. कार १ लाख किलोमीटरपेक्षा जास्त चालली असेल, तर किंमत कमी करून मागा. अनेक जण स्पीडोमीटर रिसेट करून खरा ओडोमीटर आकडा लपवतात. त्यामुळे कार कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन याची खात्री नक्की करा.

67
इंटिरियर आणि एक्सटिरियर (Interior & Exterior)
Image Credit : Asianet News

इंटिरियर आणि एक्सटिरियर (Interior & Exterior)

कारची आतून आणि बाहेरून संपूर्ण तपासणी करा. तुम्ही घेत असलेली कार अपघातात सापडली असू शकते आणि तिचे काही भाग बदललेले असू शकतात. कारची बॉडी, डॅशबोर्ड, सीट, एसी, दरवाजे, बंपर, हेडलॅम्प आणि पेंट तपासा. कारला नवीन पेंट मारला असेल, पेंट जास्त खराब झाला असेल किंवा महत्त्वाचे भाग तुटलेले असतील, तर किंमत कमी करून मागा.

कार घेताना अनेक जण टायरची स्थिती तपासणे विसरतात. कार चांगली चालायची असेल तर तिचे टायर चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे. एका टायरची किंमत ३,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असते. टायर जास्त झिजलेले असतील तर ते लवकर बदलावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट वाढेल.

काही गाड्यांमध्ये जुन्या टायरवर बनावट ग्रिप लावून ते नवीन असल्यासारखे दाखवले जाते. त्यामुळे ग्रिप बदलली आहे का, हे बारकाईने तपासा.

77
रेकॉर्ड आणि इन्शुरन्स (Records & Insurance)
Image Credit : Asianet News

रेकॉर्ड आणि इन्शुरन्स (Records & Insurance)

कार घेण्यापूर्वी तिची कागदपत्रे आणि इन्शुरन्स योग्य आहे का, हे तपासा. तुम्ही घेत असलेल्या कारवर कर्ज (Loan) आहे का, मालकाची माहिती बरोबर आहे का, कंपनीत सर्व्हिसिंग झाली आहे का, इन्शुरन्स चालू आहे का आणि गाडीवर काही अपघात किंवा गुन्हेगारी केसेस आहेत का, याची संपूर्ण चौकशी करा. या सर्व गोष्टी योग्य असतील तरच ती कार घेण्याचा अंतिम निर्णय घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
Recommended image2
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image4
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image5
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Related Stories
Recommended image1
Upcoming 7 Seater Cars : मारुती आणि टोयोटा आणतायत 5 भन्नाट 7-सीटर कार्स
Recommended image2
Top Selling Cars : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या? लोक याच कार्स का खरेदी करतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved