- Home
- Utility News
- डिफेंडरला टक्कर देण्यासाठी टाटा तयार, हि गाडी खरेदी करून कमी किंमतीत प्रीमियमचा घ्या आनंद
डिफेंडरला टक्कर देण्यासाठी टाटा तयार, हि गाडी खरेदी करून कमी किंमतीत प्रीमियमचा घ्या आनंद
टाटा समूहाने दोन दशकांनंतर टाटा सियारा गाडीला बाजारात आणले आहे, जिला 'मिनी डिफेंडर' म्हणून ओळखले जात आहे. ही ऑफ-रोडिंग गाडी मजबूत लूक, मेटॅलिक रूफ रॅक आणि ट्रेकिंगसाठी खास ऍक्सेसरीज किटसह उपलब्ध आहे.

डिफेंडरला टक्कर देण्यासाठी टाटा तयार, हि गाडी खरेदी करून कमी किंमतीत प्रीमियमचा घ्या आनंद
अनेक वर्षांपासून टाटा कंपनीची टाटा सियारा हि गाडी लॉन्च होण्याची ग्राहक वाट पाहत होते. टाटा समूहाने दोन दशकानंतर या गाडीला मार्केटमध्ये आणलं आहे. या गाडीमध्ये ७ व्हेरियंट कंपनीकडून देण्यात आले आहेत.
टाटा सियारा मिनी डिफेंडर घेऊन येणार बाजारात
टाटा सियारा कंपनी मिनी डिफेंडर घेऊन मार्केटमध्ये दाखल होणार आहे. Tata Sierra ROQ म्हणजेच टाटा कंपनीची मिनी डिफेंडर मार्केटमध्ये येणार आहे. या गाडीला असा लूक दिला आहे कि त्यामुळं ती गाडी ऑफ रोडींगसाठी खासकरून ओळखली जाईल.
बोनेटवर येणार मॉडेलचा सिम्बॉल
या गाडीच्या बॉनेटवर मॉडेलच्या नावाचा सिम्बॉल येणार आहे. बंपर आणि व्हील आर्चवर जाड मॅट क्लॅडिंग आणि मजबूत ब्लॅक साईड स्टेप्स देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं गाडी अजून उठावदार दिसायला मदत मिळते.
गाडीच्या छतावर मेटॅलिक रूफ रॅक
या गाडीच्या छतावर मेटॅलिक रूफ रॅक देण्यात आला आहे. त्याला चढण्यासाठी एका बाजूने फोल्डेबल शिडी कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. डिफेंडर मध्ये असणारी शिडी यामध्ये दिली आहे.
कंपनीकडून काय दिली ऍक्सेसरीज?
कंपनीकडून ऍक्सेसरीज देण्यात आलेल्या आहेत. या गाडीमध्ये कॉफी मेकर, टेन्ट, खुर्ची आणि मिनी ओव्हर असं अतिरिक्त सामान देण्यात आलं आहे. ट्रेकिंगला गेल्यानंतर बसण्यासाठी दोन सीट्स देण्यात आले आहेत.
किटची किंमत किती?
कंपनी हि किटची किंमत अतिरिक्त स्वरूपात आकारणार आहे. कंपनीने एका पॅकची किंमत ५० हजार रुपये आणि दुसऱ्या पॅकची किंमत एक लाख रुपये असेल असं सांगितलं आहे.

