- Home
- Maharashtra
- Maharashtra Cold Wave Alert : सावधान! महाराष्ट्रात थंडीचा 'विक्रम मोडणारा' तडाखा; तुमच्या जिल्ह्यात तापमान किती घसरणार? ७ जिल्ह्यांना थेट इशारा
Maharashtra Cold Wave Alert : सावधान! महाराष्ट्रात थंडीचा 'विक्रम मोडणारा' तडाखा; तुमच्या जिल्ह्यात तापमान किती घसरणार? ७ जिल्ह्यांना थेट इशारा
Maharashtra Cold Wave Alert : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट आली असून हवामान विभागाने कोल्ड वेव्हचा अलर्ट जारी केला. पुणे, सोलापूर, नाशिकसह ७ जिल्ह्यांना इशारा दिलाय. मुंबईसह राज्यात तापमानात मोठी घट अपेक्षितय.

महाराष्ट्रात कोल्ड वेव्हचा जोरदार तडाखा!
मुंबई : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी राज्यात गारठा प्रचंड वाढला आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने कोल्ड वेव्हचा अलर्ट जारी केला आहे. थंडीच्या तीव्रतेमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांना थेट इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतही वाढला गारवा
मुंबई शहर आणि उपनगरात गारठा जाणवू लागला आहे.
2 डिसेंबर रोजी तापमानात आणखी 1 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमान : 31°C
किमान तापमान : 15°C
पुणे–सोलापूरला कोल्ड वेव्हचा फटका
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होणार आहे.
पुणे किमान तापमान : 10°C
सोलापूरला कोल्ड वेव्ह अलर्ट
पुणेकऱ्यांना या काळात असामान्य थंडीची अनुभूती येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमान 8°C–9°C पर्यंत खाली
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
येथे किमान तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअस राहील.
मराठवाड्यात थंडीची लाट
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 12°C पर्यंत खाली येईल.
उर्वरित मराठवाड्यातही रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट दिसून येईल.
विदर्भात ढगाळ वातावरण आणि धुके
विदर्भात काही प्रमाणात धुक्याची शक्यता असून किमान तापमान 12°C च्या आसपास राहील.
नागपूर, अमरावतीसह सर्व जिल्ह्यात गारवा टिकून राहील.
नागरिकांना इशारा, काळजी घ्या!
गरम कपडे वापरा
पुरेसे पाणी प्या
लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी
गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे
राज्यात सर्वत्र तापमानात तीव्र घट होणार असल्याने नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपावी, असे हवामान विभागाचे आवाहन आहे.

