Sony MDR 3R : सोनीने परत आणली जुन्या वॉकमनची आठवण, रेक्ट्रो लूक आणि टाइप-सी पोर्ट
Sony MDR-3R Headphones: 1979 मधील प्रसिद्ध वॉकमन डिझाईन सोनीने पुन्हा बाजारात आणले आहे. 'MDR-3R' हे रेट्रो स्टाईलचे वायर्ड हेडफोन लाँच करण्यात आले आहेत. जुन्या 3.5 मिमी ऑडिओ जॅक ऐवजी यात आता आधुनिक USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

सोनी MDR-3R हेडफोन
प्रसिद्ध टेक ब्रँड सोनीने (Sony) त्यांच्या जुन्या ऑडिओ डिव्हाईसच्या आठवणी जागवत एक नवीन वायर्ड (Wired) हेडफोन बाजारात आणला आहे. 'सोनी MDR-3R' (Sony MDR-3R) नावाचा हा हेडफोन मूळतः 1979 मध्ये पहिल्या वॉकमन (Walkman) सोबत आलेल्या प्रसिद्ध MDR-3 मॉडेलच्या डिझाईनवर आधारित आहे. जुन्या मॉडेलची ती हलकी 'ओपन-इयर' (Open-Ear) डिझाईन आणि रेट्रो लूक कंपनीने तसाच ठेवला आहे. पण जुन्या 3.5 मिमी ऑडिओ जॅकऐवजी यात आधुनिक यूएसबी टाइप-सी (USB Type-C) पोर्ट दिला आहे. तसेच यात 23 मिमी ड्रायव्हर, इन-लाइन रिमोट आणि मायक्रोफोनची सुविधाही आहे.

किंमत आणि खरेदी
सोनी MDR-3R (स्टँडर्ड एडिशन):
याची किंमत अंदाजे 5,600 रुपये आहे.
सोनीची अधिकृत वेबसाईट, अॅमेझॉन, बेस्ट बाय (Best Buy) आणि मान्यताप्राप्त रिटेल स्टोअर्समधून हे खरेदी करता येईल.
सोनी MDR-3R स्ट्रेंजर थिंग्स एडिशन (Stranger Things Edition):
या स्पेशल एडिशनची किंमत अंदाजे 7,500 रुपये आहे.
सोनीची वेबसाईट, नेटफ्लिक्स शॉप (Netflix Shop) आणि अॅमेझॉनवर याची प्री-ऑर्डर करता येईल.
स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
रेट्रो डिझाईन: यात 1979 च्या MDR-3 मॉडेलचा हुबेहूब लूक आहे. सोबत निळ्या आणि नारिंगी रंगाचे बदलता येणारे (Interchangeable) इअरपॅड दिले जात आहेत. जुन्या दिवसांची आठवण करून देण्यासाठी याचे पॅकिंग बॉक्स आणि युझर मॅन्युअलही रेट्रो स्टाईलमध्ये डिझाईन केले आहे. यूएसबी टाइप-सी सुविधा: या हेडफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे यूएसबी टाइप-सी कनेक्शन. ब्लूटूथ कनेक्ट करण्याची किंवा वेगळे चार्ज करण्याची झंझट न घेता हे आधुनिक उपकरणांशी थेट जोडले जाऊ शकते.
मायक्रोफोन आणि रिमोट: कॉल उचलण्यासाठी किंवा ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी याच्या केबलवर इन-लाइन रिमोट आणि मायक्रोफोनची सोय दिली आहे.
स्ट्रेंजर थिंग्स सोनी हेडफोन
ऑडिओ क्वालिटी: 23 मिमी ड्रायव्हरच्या साहाय्याने हे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील ओपन साउंड प्रोफाईलचा (Open sound profile) अनुभव देईल. तथापि, आधुनिक डिजिटल ऑडिओ फॉरमॅटशी जुळवून घेण्यासाठी साउंडमध्ये काही किरकोळ अपग्रेडही करण्यात आले आहेत. स्ट्रेंजर थिंग्स एडिशन (Stranger Things Edition): नेटफ्लिक्ससोबत मिळून बनवलेले हे स्पेशल एडिशन प्रसिद्ध 'Stranger Things' सीरिजच्या 'Max Mayfield' पात्राच्या डिझाईनवर आधारित आहे. यात 'Upside Down' थीमवर आधारित कोरलेला लोगो, लाल-काळ्या रंगाचे इअरपॅड आणि स्पेशल थीम पॅकिंग आहे.

