MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Jio Diwali Offer : जिओची भन्नाट दिवाळी ऑफर; 5 महिने रिचार्ज आणि OTT एकदम फ्री

Jio Diwali Offer : जिओची भन्नाट दिवाळी ऑफर; 5 महिने रिचार्ज आणि OTT एकदम फ्री

Jio Diwali Offer: दिवाळीच्या मुहूर्तावर जिओने ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. यात ५ महिन्यांचा फ्री रिचार्ज आणि अनेक भन्नाट फायदे मिळत आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 06 2026, 03:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जिओची भन्नाट दिवाळी ऑफर
Image Credit : Asianet News

जिओची भन्नाट दिवाळी ऑफर

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ५ महिन्यांसाठी फ्री सर्व्हिस मिळणार आहे. एवढंच नाही, तर लाईव्ह टीव्ही, अनलिमिटेड वायफाय आणि अनेक लोकप्रिय OTT अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही एकदम फ्री मिळतंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
५ महिन्यांची सर्व्हिस एकदम फ्री
Image Credit : X

५ महिन्यांची सर्व्हिस एकदम फ्री

जिओची ही स्पेशल ऑफर 'जिओ होम' (JioHome) सर्व्हिसवर मिळतेय. यात जिओ फायबर (JioFiber) आणि जिओ एअरफायबर (JioAirFiber) प्लॅन्सचा समावेश आहे. कंपनीने याला 'फ्रीडम ऑफर' असं नाव दिलंय. जिओने नुकतीच X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केलीये. त्यानुसार, तुम्ही १० महिन्यांचे पैसे भरल्यास तुम्हाला १५ महिन्यांसाठी JioHome सर्व्हिस मिळेल. म्हणजेच, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ५ महिन्यांची सर्व्हिस पूर्णपणे फ्री मिळणार आहे.

Related Articles

Related image1
JioFiber vs Airtel WiFi : 399चा जिओ की 499चा एअरटेल? घरच्या वायफायसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
Related image2
Cheapest Prepaid Plans : जिओ, एअरटेल आणि Vi चे सर्वात स्वस्त व्हॅलिडिटी प्लॅन्स
34
जिओ होमची ५ महिन्यांची फ्री ऑफर कशी मिळवायची?
Image Credit : X

जिओ होमची ५ महिन्यांची फ्री ऑफर कशी मिळवायची?

दिवाळी सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून जिओ ही खास ऑफर देत आहे. यानुसार, ग्राहकांनी दरमहा ६६६ रुपये याप्रमाणे १० महिन्यांसाठी जिओ होम रिचार्ज केल्यास, त्यांना एकूण १५ महिन्यांसाठी अनलिमिटेड एंटरटेनमेंट मिळेल. १० महिन्यांचे पैसे भरल्यावर ५ महिन्यांची सर्व्हिस फ्री मिळेल. पण, ही जिओ होम फ्रीडम ऑफर सध्या फक्त JioHome सर्व्हिस वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे, असं कंपनीने स्पष्ट केलंय.

44
ही ऑफर कशी मिळवायची?
Image Credit : Asianet News

ही ऑफर कशी मिळवायची?

ही स्पेशल ऑफर मिळवण्यासाठी पात्र ग्राहकांना 8219582195 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. नवीन ग्राहकांनी दोन महिन्यांचा JioHome प्लॅन घेतल्यास त्यांना एक महिन्याची अतिरिक्त सर्व्हिस फ्री दिली जातेय. जिओ होम सर्व्हिसमध्ये १५ भाषांमधील १,००० हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल्स पाहण्याची सुविधा आहे. यासोबतच अनेक OTT अ‍ॅप्स आणि अनलिमिटेड हाय-स्पीड वायफायची सुविधाही मिळते.

जिओच्या माहितीनुसार, ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय JioTV+ अ‍ॅपद्वारे एकाच जिओ सेट-टॉप बॉक्सचा वापर करून घरातील दोन स्मार्ट टीव्हीवर कार्यक्रम पाहू शकतात. वार्षिक प्लॅन निवडल्यास जिओ होम इन्स्टॉलेशन फ्री केलं जाईल. या सेटअपमध्ये वायफाय राउटर, 4K टीव्ही सेट-टॉप बॉक्स आणि आउटडोअर डिव्हाइस मिळेल. नुकतंच जिओने फक्त १५ रुपयांचा एक नवीन रिचार्ज पॅकही लाँच केलाय. या पॅकमध्ये २४ तासांसाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट सुविधा मिळते.

दुसरीकडे, जिओ आपल्या वर्धापन दिनानिमित्त आणखी एक खास ऑफर देत आहे. फक्त १,४९९ रुपयांना नवीन जिओ भारत (JioBharat) कीपॅड फोन खरेदी केल्यास, त्यासोबत ६ महिन्यांचा रिचार्ज फ्री मिळेल. या ऑफरमध्ये JioBharat A1, B1, B2 आणि B3 सिरीजच्या फोन्सचा समावेश आहे. फ्री रिचार्जमध्ये दर महिन्याला 14GB डेटा (रोज 0.5GB) आणि अनलिमिटेड HD कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच ५०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, JioPay, JioSaavn, JioHotstar, सेफ्टी फर्स्ट फीचर आणि २३ भारतीय भाषांचा सपोर्टही या फोन्समध्ये मिळतोय.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Phone Charger : फोन काढला, पण चार्जर तसाच प्लगमध्ये आहे? तरीही वीज खर्च होते का?
Recommended image2
Bank Locker Safety : आता बँक लॉकरमध्येही तुमचे सोने सुरक्षित नाही? महिलेचे 47 लाखांचे दागिने गायब
Recommended image3
Kia Seltos Vs Hyundai Creta : धनत्रयोदशीला कोणती SUV खरेदी करावी?
Recommended image4
Dhanteras Investment : धनत्रयोदशीला १० ग्रॅम सोनं घ्यावं की १ किलो चांदी? वाचा या टिप्स
Recommended image5
OpenAI GPT-6 Cyber : ओपनएआयने लाँच केले नवे मॉडेल, सॉफ्टवेअरमधील चुका शोधणार
Related Stories
Recommended image1
JioFiber vs Airtel WiFi : 399चा जिओ की 499चा एअरटेल? घरच्या वायफायसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
Recommended image2
Cheapest Prepaid Plans : जिओ, एअरटेल आणि Vi चे सर्वात स्वस्त व्हॅलिडिटी प्लॅन्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved