- Home
- Utility News
- SBI Offers : भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी, मिळणार 1 कोटी रुपये, पण ही ऑफर नेमकी कुणासाठी?
SBI Offers : भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी, मिळणार 1 कोटी रुपये, पण ही ऑफर नेमकी कुणासाठी?
SBI Insurance: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आंध्र प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना तब्बल 1 कोटी रुपये देणार आहे. नुकतेच एका कुटुंबाला हे पैसे मिळाले आहेत. यासाठी कोण पात्र आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

SBI मध्ये खाते असल्यास मिळणार 1 कोटी रुपये -
SBI ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. बँक आपल्या सॅलरी अकाउंट असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचा अपघात विमा देत आहे. हा विमा कोणाला लागू होतो, ते जाणून घेऊया.
SBI अपघात विम्यासाठी कोण पात्र आहे?
आंध्र प्रदेश सरकारने SBI सोबत करार केला आहे. यानुसार, SBI मध्ये सॅलरी अकाउंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना अपघात विमा मिळेल. यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागणार नाहीत. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळतील.
कॉन्स्टेबलच्या कुटुंबाला मिळाले 1 कोटी रुपये -
SBI मध्ये सॅलरी अकाउंट असलेले उत्पादन शुल्क हेड कॉन्स्टेबल पी. राव यांचा अपघाती मृत्यू झाला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. SBI सोबतच्या करारानंतर 1 कोटी विमा रक्कम मिळवणारे हे पहिले कुटुंब आहे.
एम्प्लॉई हेल्थ स्कीम (EHS) -
SBI अपघात विम्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांनी EHS योजनेबद्दल काळजी करू नये. ती योजना सुरूच राहील. यानुसार कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कॅशलेस उपचार घेऊ शकतात. पण SBI ची ही योजना फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे.
एपी स्टेट एम्प्लॉइज ग्रुप इन्शुरन्स स्कीम -
APSEGIS ही आंध्र प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योजना आहे. यात पगारातून रक्कम कापली जाते. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा मिळतो. निवृत्तीवेळी रक्कम व्याजासह परत मिळते.

