Symptoms of Heart Disease in Women : महिलांमध्ये हृदयविकाराची ही आहेत 'सहा' लक्षणे
जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयरोग. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, यूएसमधील 44 टक्क्यांहून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हृदयविकाराने जगत आहेत.

महिलांमध्ये हृदयविकाराची सहा लक्षणे -
जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयरोग. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, यूएसमधील 44 टक्क्यांहून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हृदयविकाराने जगत आहेत.
कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) हा सर्वात सामान्य हृदयरोग -
चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) हा सर्वात सामान्य हृदयरोग आहे. महिलांमधील लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. त्याचबाबत आज जाणून घेऊया.
सतत थकवा जाणवणे हे पहिले लक्षण -
सतत थकवा जाणवणे हे पहिले लक्षण आहे. विश्रांतीनंतरही हा थकवा जात नाही. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे असे होऊ शकते. यामुळे स्त्रियांना सामान्य कामातही थकवा येतो.
जबडा किंवा मानेत दुखणे हे आणखी एक लक्षण -
जबडा किंवा मानेत दुखणे हे आणखी एक लक्षण आहे. जबडा, मान आणि खांद्यापर्यंत वेदना जाणवत असल्यास, ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वाढतो.
श्वास घेण्यास त्रास होणे हे महिलांमधील हृदयविकाराचे गंभीर लक्षण -
झोपताना किंवा इतर वेळी अचानक श्वास घेण्यास त्रास होणे हे महिलांमधील हृदयविकाराचे गंभीर लक्षण असू शकते. हृदयाच्या अकार्यक्षमतेमुळे फुफ्फुसात द्रव साचतो, ज्यामुळे हे घडते.
मळमळ, उलट्या किंवा पोटदुखी हे हृदयविकाराचे लक्षण -
मळमळ, उलट्या किंवा पोटदुखी ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. अनेक महिलांना हे पचनाचे त्रास वाटतात. पण हृदयविकाराच्या झटक्यावेळी आतड्यांचा रक्तप्रवाह कमी झाल्याने असे होते.
घोट्याला किंवा पायाला अनपेक्षित सूज येणे -
घोट्याला किंवा पायाला अनपेक्षित सूज येणे हे आणखी एक लक्षण आहे. हे हृदयाच्या पंपिंगमधील बिघाडामुळे शरीरात द्रव साचल्याचे सूचित करते.
असामान्य घाम किंवा चक्कर येणे -
असामान्य घाम किंवा चक्कर येणे हे आणखी एक लक्षण आहे. उष्णता किंवा डिहायड्रेशनशिवाय अचानक चक्कर/डोकेदुखी किंवा थंड घाम येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

