MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ मळा अशा पद्धतीने, घ्या अनुभव...

Kitchen Tips: चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ मळा अशा पद्धतीने, घ्या अनुभव...

Kitchen Tips: रोज चपाती किंवा पोळी बनवूनही अनेकांना ती मऊ लुसलुशीत बनवता येत नाही. कधी चपात्या कडक होतात, तर कधी लाटताना पोळपाटाला चिकटतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे पीठ मळताना होणाऱ्या चुका. या चुका कशा टाळाव्यात जाणून घ्या….

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 18 2026, 10:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
चपातीचे पीठ मळण्याची पद्धत महत्त्वाची
Image Credit : youtube @sangeetareallife

चपातीचे पीठ मळण्याची पद्धत महत्त्वाची

चपाती किंवा पोळी हा भारतीयांच्या सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. पण मऊ आणि टम्म फुगलेल्या पोळ्या बनवणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. यासाठी पीठ मळण्याची पद्धत खूप महत्त्वाची ठरते.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
चपातीसाठी किती पाणी वापरावे
Image Credit : getty

चपातीसाठी किती पाणी वापरावे

चपातीसाठी लागणारं पाणी नेहमी पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. साधारणपणे, 2 कप गव्हाच्या पिठासाठी सुमारे 1 कपापेक्षा थोडं कमी पाणी लागतं. म्हणजे पीठ आणि पाण्याचं प्रमाण 2:1 असं हवं. पीठ थोडं जाडसर असेल, तर ते जास्त पाणी शोषून घेतं. तेव्हा थोडं जास्त पाणी लागू शकतं.

Related Articles

Related image1
Chapati Recipes : शिळ्या चपात्या फेकू नका, बनवा हे 5 चविष्ट पदार्थ, सगळेच खातील आवडीने
Related image2
Soft Chapati : रात्री मळलेल्या पिठाच्या चपात्या मऊ हव्यात?, मग 'हे' पदार्थ नक्की घाला
35
साधं पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा
Image Credit : getty

साधं पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा

चपात्या जास्त वेळ मऊ राहाव्यात असं वाटत असेल, तर साधं पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे पिठातील प्रोटीन सक्रिय होतं आणि पीठ जास्त मऊ होतं.
45
पाण्याऐवजी दुधाने पीठ मळा
Image Credit : istockphoto

पाण्याऐवजी दुधाने पीठ मळा

कधीकधी चपात्या लवकर कोरड्या पडतात. अशावेळी कोमट पाणी उत्तम काम करतं. पण तुम्हाला अजून मऊ आणि पांढरेशुभ्र चपात्या हव्या असतील, तर पाण्याऐवजी दुधाने पीठ मळू शकता. यामुळे चपातीला एक क्रीमी चव येते.
55
पीठ मळल्यानंतर ते 15-20 मिनिटं झाकून ठेवा
Image Credit : Freepik

पीठ मळल्यानंतर ते 15-20 मिनिटं झाकून ठेवा

बरेच जण पीठ मळल्याबरोबर लगेच चपात्या लाटायला घेतात. पण चांगल्या चपात्यांसाठी, पीठ मळल्यानंतर ते एका कापडाने किंवा ताटाने झाकून १५-२० मिनिटं तसंच ठेवा. यानंतर केलेल्या चपात्या छान मऊ होतात.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Radhika Merchant: अंबानींच्या सूनबाई भारतात परतल्या! अमेरिकेतील करिअर का सोडलं?
Recommended image2
Graveyard Dating: Gen Z चे आता स्मशानात डेटिंग! काय आहे हे नवीन प्रकरण?
Recommended image3
Psychology Tricks: समोरच्याच्या मनात दडलंय काय? या 5 ट्रिक्सने लगेच ओळखा!
Recommended image4
Car Market: टाटा मोटर्सच्या गाड्या महागणार, कोणत्या मॉडेल्सच्या किमती वाढणार?
Recommended image5
Car Dashboard Lights: गाडी चालवताना या लाइट्सकडे दुर्लक्ष नको! जाणून घ्या कारणे
Related Stories
Recommended image1
Chapati Recipes : शिळ्या चपात्या फेकू नका, बनवा हे 5 चविष्ट पदार्थ, सगळेच खातील आवडीने
Recommended image2
Soft Chapati : रात्री मळलेल्या पिठाच्या चपात्या मऊ हव्यात?, मग 'हे' पदार्थ नक्की घाला
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved