Renault Sales : रेनो कंपनीने ऑक्टोबर महिन्यात धुमाकूळ घातला आहे. या महिन्यात कंपनीच्या सेल्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. खासकरुन 7 सीटर कारची सर्वाधिक विक्री करण्यात आली आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Renault Sales : यंदाचा वर्षातील ऑक्टोंबर महिना रेनो कंपनीसाठी धमाकेदार ठरला आहे. कंपनीने या महिन्यात 4,672 यूनिट्सची विक्री केल्याने वर्षभराच्या तुलनेत (YOY) 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय रेनॉल्टच्या विक्रीतही सप्टेंबरच्या तुलनेत 10 टक्के (MoM) वाढ झाली. मात्र खरा गेमचेंजर ठरली ती ट्रायबर कार. या कारने कंपनीची अर्ध्याहून अधिक विक्रीचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याबद्दलच खाली सविस्तर जाणून घेऊया.

रेनोची मार्केट पोझिशन

भारतीय ऑटो मार्केटमध्ये रेनो (Renault) 10 व्या स्थानावर राहिली. याचे मार्केट शेअर 1.1 टक्क्यांनी गेल्या वर्षाप्रमाणेच राहिले. तर निसान (Nissan) 12 व्या स्थानावर राहिली. याच्या मार्केट शेअरमध्ये घसरण होत 0.6 टक्क्यांवर आली. रेनोच्या लाइनअपमध्ये सध्या Triber, Kiger आणि Kwid आहे. आता रेनो मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. नवी डस्टर (Duster) येत्या 26 जानेवारी 2026 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. SUV मार्केटमध्ये पुन्हा एकदा ही कार धमाका करू शकते.

रेनो सेल्स ब्रेकअप- ऑक्टोंबर 2025

ऑक्टोंबर 2025 मध्ये रेनोच्या तीन कारने उत्तम कामगिरी केली. ट्राइबरने रेकॉर्ड केला तर काइगर आणि क्विडमुळे थोडी निराशा झाली.

रेनो ट्राइबर

रेनो ट्राइबरचे 3170 यूनिट्सची विक्री झाली, जी 50 टक्के YoY ग्रोथ आणि 23% MoM ग्रोथ आहे. ट्राइबरने धमाकेदार कामगिरी केली. ही रेनोची एकमेव अशी कार आहे जी पॉझिटिव्ह YoY आणि MoM ग्रोथमध्ये आली.

रेनो काइगर

रेनो काइगरच्या विक्रीत घट अद्याप सुरू आहे. या कारचे गेल्या तीन महिन्यात केवळ 948 युनिट्स विक्री झाले. जे YoY ची घट होती आणि 19 टक्क्यांची MoM होती.

रेनो क्विड

रेनो क्विडची विक्री 554 यूनिट्सच राहिली. जी 22 टक्क्यांची YoY घट आहे. तर मासिक आधारावर (MoM) वर 8 टक्क्यांनी फार कमी रिकव्हरी आहे. क्विडच्या सेल्सवर माइक्रो हॅचबॅक मार्केटमध्ये घसरती मागणी स्पष्टपणे दिसत आहे.