MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Redmi 17C 5G Launch : 50MP कॅमेरा आणि 600mAh बॅटरीसह रेडमीचा नवा फोन भारतात लाँच, बजेट युजर्ससाठी खास भेट!

Redmi 17C 5G Launch : 50MP कॅमेरा आणि 600mAh बॅटरीसह रेडमीचा नवा फोन भारतात लाँच, बजेट युजर्ससाठी खास भेट!

शाओमीने आपला नवीन 'Redmi 17C 5G' स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ५०MP कॅमेरा आणि ३३W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली ६,०००mAh ची दमदार बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 01 2026, 02:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
भारतात लाँच झाला Redmi 17C 5G
Image Credit : google

भारतात लाँच झाला Redmi 17C 5G

रेडमीने आपली नवीन बजेट सिरीज 'Redmi 17C 5G' भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे. नुकत्याच आलेल्या 'Redmi 17 5G' नंतर कंपनीने हा नवीन फोन बाजारात आणला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ६००० सिरीज प्रोसेसर, ६,०००mAh बॅटरी आणि १२०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.९ इंचाचा मोठा डिस्प्ले या फोनमध्ये मिळतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
फोनची किंमत आणि सेलची माहिती
Image Credit : google

फोनची किंमत आणि सेलची माहिती

४GB रॅम + १२८GB स्टोरेज (बेस व्हेरियंट) - २०,९९९ रुपये

६GB रॅम + १२८GB स्टोरेज (टॉप व्हेरियंट) - २२,९९९ रुपये

हा स्मार्टफोन ७ ऑक्टोबरपासून ॲमेझॉन (Amazon) आणि शाओमीच्या (Xiaomi) अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ग्राहक हा फोन 'कॉफी ब्रू' (Coffee Brew), 'डार्क नाईट' (Dark Night) आणि 'पर्पल डॉन' (Purple Dawn) या ३ आकर्षक रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

Related Articles

Related image1
Hybrid Compact SUV: लिटरला ३५ किमी मायलेज! भारतात येत आहेत ५ भन्नाट हायब्रिड कार्स
Related image2
Upcoming Bikes In India : 349cc ते 585cc पर्यंत... ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 6 बाइक्सची लिस्ट!
34
Redmi 17C 5G चे भन्नाट फीचर्स
Image Credit : google

Redmi 17C 5G चे भन्नाट फीचर्स

डिस्प्ले - शाओमीने या फोनमध्ये ६.९ इंचाचा HD+ (720 x 1,600 पिक्सल्स) LCD डिस्प्ले दिला आहे. यात १२०Hz रिफ्रेश रेट, ८१० निट्स ब्राइटनेस, २४०Hz टच सॅम्पलिंग रेट आणि TÜV राईनलँड सर्टिफिकेशन मिळते.

प्रोसेसर - हा फोन ऑक्टा-कोर 'मीडियाटेक डायमेन्सिटी ६३००' चिपसेटवर चालतो. सोबतच Mali-G57 MC2 GPU दिला आहे. हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित शाओमीच्या HyperOS 3 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

मेमरी - यात ६GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि १२८GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. तसेच, ६GB व्हर्च्युअल रॅम आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधाही आहे.

44
कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग
Image Credit : google

कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग

कॅमेरा - या फोनच्या मागे f/1.8 अपर्चर असलेला ५० मेगापिक्सल्सचा सिंगल कॅमेरा (1080p/ 30 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग) दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चर असलेला ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात HDR, पोर्ट्रेट, नाईट मोड आणि टाइम-लॅप्स सारखे फीचर्स आहेत.

बॅटरी आणि इतर फीचर्स - फोनमध्ये ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६,०००mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळ/पाण्यापासून बचावासाठी IP64 रेटिंग मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि GPS सारख्या सुविधा आहेत. फोनचे वजन सुमारे २११ ग्रॅम असून आकार 171.56 x 79.47 x 7.99 मिमी आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Jewellery Making Charges : सोन्याचे दागिने घेताना मेकिंग चार्जेसच्या नावाखाली तुम्ही नक्की कशाचे पैसे देता?
Recommended image2
Upcoming Bikes In India : 349cc ते 585cc पर्यंत... ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 6 बाइक्सची लिस्ट!
Recommended image3
New FD Rules : आजपासून एफडीचे नियम बदलले, तुमच्यावर काय परिणाम होणार?
Recommended image4
EaseMyTrip ने भारतात लाँचसाठी केली पार्टनरशिप, बुकिंग होणार सोपे; वाचा संपूर्ण डिटेल्स
Recommended image5
Maruti Suzuki Victoris SUV: २७ किमी मायलेज, ३६०° कॅमेरा आणि ADAS; ग्रँड विटारालाही टाकलं मागे!
Related Stories
Recommended image1
Hybrid Compact SUV: लिटरला ३५ किमी मायलेज! भारतात येत आहेत ५ भन्नाट हायब्रिड कार्स
Recommended image2
Upcoming Bikes In India : 349cc ते 585cc पर्यंत... ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 6 बाइक्सची लिस्ट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved