MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Upcoming Bikes In India : 349cc ते 585cc पर्यंत... ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 6 बाइक्सची लिस्ट!

Upcoming Bikes In India : 349cc ते 585cc पर्यंत... ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 6 बाइक्सची लिस्ट!

बीएमडब्ल्यू, होंडा, ट्रायम्फ, नॉर्टन, बजाज आणि यामाहा या दिग्गज कंपन्या ऑक्टोबर 2026 मध्ये त्यांच्या नवीन पेट्रोल बाइक्स भारतात लाँच करत आहेत. टू-व्हीलर मार्केटमध्ये या महिन्यात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 01 2026, 12:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
ऑक्टोबरमध्ये भारतीय बाईक मार्केटमध्ये रंगणार चुरस!
Image Credit : x

ऑक्टोबरमध्ये भारतीय बाईक मार्केटमध्ये रंगणार चुरस!

भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये ऑक्टोबर 2026 हा महिना नवीन बाईक घेणाऱ्या ग्राहकांसाठी खूप खास असणार आहे. बीएमडब्ल्यू, होंडा, ट्रायम्फ, यामाहा आणि बजाज यांसारख्या जगभरातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या नवीन बाइक्स भारतीय बाजारात लाँच करत आहेत.

2 लाख रुपयांच्या बजेटपासून ते 13 लाखांहून अधिक किंमतीच्या लक्झरी बाइक्सपर्यंत, सर्वसामान्यांसाठी आणि तरुणांसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या नवीन पेट्रोल बाइक्सची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
बीएमडब्ल्यू एफ 450 आर (BMW F 450 R)
Image Credit : BMW

बीएमडब्ल्यू एफ 450 आर (BMW F 450 R)

बीएमडब्ल्यू कंपनी 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ही दमदार स्ट्रीटफायटर (Streetfighter) बाईक अधिकृतपणे लाँच करत आहे. कंपनीने यात 420cc पॅरलल-ट्विन इंजिन दिले आहे, जे 47 PS पॉवर आणि 43 Nm टॉर्क जनरेट करते. तमिळनाडूतील होसूर येथील टीव्हीएस (TVS) प्लांटमध्ये या बाईकचे उत्पादन होत असल्याने, तिची बांधणी भारतीय रस्त्यांसाठी एकदम परफेक्ट आहे.

Related Articles

Related image1
Upcoming Car Launches : दिवाळीत नवीन कार घेताय? बाजारात येतायत हे भन्नाट मॉडेल्स
Related image2
Bike Tyre Lifespan : तुमच्या बाईकचा टायर लवकर घासतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा, टेन्शन विसरा
37
ट्रायम्फ बोनव्हिल 400 (Triumph Bonneville 400)
Image Credit : Triumph

ट्रायम्फ बोनव्हिल 400 (Triumph Bonneville 400)

ट्रायम्फ कंपनी सध्या भारतीय रस्त्यांवर या बाईकची कसून टेस्टिंग करत आहे. सध्याच्या स्पीड 400 मॉडेलपेक्षा या बाईकमध्ये पूर्णपणे वेगळी चेसिस आणि स्विंगआर्म डिझाईन पाहायला मिळेल. कंपनीने यात 349cc इंजिन दिले असून, ही बाईक अतिशय रुबाबदार आणि आरामदायी क्लासिक रायडिंगचा अनुभव देईल.

47
बजाज पल्सर एनएस125 (Bajaj Pulsar NS125)
Image Credit : Bajaj

बजाज पल्सर एनएस125 (Bajaj Pulsar NS125)

कमी बजेटमध्ये जास्त मायलेज आणि स्पोर्टी लूक शोधणाऱ्या ग्राहकांसाठी बजाजचे हे नवीन अपडेटेड मॉडेल शोरूममध्ये येण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही; यात जुनेच 124.45cc इंजिन (12 HP पॉवर) मिळेल. पण, कंपनीने यात नवीन आकर्षक रंग आणि पूर्णपणे नवीन डिजिटल मीटर कन्सोल दिला आहे.

57
नॉर्टन ॲटलस (Norton Atlas)
Image Credit : Norton Atlas

नॉर्टन ॲटलस (Norton Atlas)

टीव्हीएस (TVS) च्या मालकीचा प्रसिद्ध नॉर्टन ब्रँड मिडलवेट ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये ही दमदार बाईक घेऊन येत आहे. कंपनीने यात 585cc पॅरलल-ट्विन इंजिन दिले असून ते 69 PS पॉवर देते. तसेच, ॲडजस्टेबल केवायबी (KYB) सस्पेन्शन आणि मोठा 7.2 इंचाचा टीएफटी (TFT) डिस्प्ले यांसारखे प्रीमियम फीचर्स यात मिळतील.

67
होंडा रेबेल 500 (Honda Rebel 500)
Image Credit : Honda Rebel 500

होंडा रेबेल 500 (Honda Rebel 500)

होंडा कंपनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या क्रूझर (Cruiser) बाईक सेगमेंटमध्ये हे मोठे 471cc पॅरलल-ट्विन इंजिन असलेले मॉडेल लाँच करणार आहे. हे इंजिन 46 PS पॉवर जनरेट करते. गिअर बदलताना क्लच दाबायची गरज पडू नये म्हणून कंपनीने यात अत्याधुनिक 'ई-क्लच' (E-Clutch) तंत्रज्ञान दिले आहे, जे या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

77
यामाहा टेनेरे 700 (Yamaha Tenere 700)
Image Credit : Yamaha Tenere 700

यामाहा टेनेरे 700 (Yamaha Tenere 700)

हायवे आणि खडबडीत डोंगराळ रस्त्यांवर ॲडव्हेंचर राईडची आवड असणाऱ्या प्रीमियम बाईक प्रेमींसाठी यामाहा ही ॲडव्हेंचर बाईक आणत आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 13 लाख ते 14 लाख रुपयांच्या घरात असू शकते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
New FD Rules : आजपासून एफडीचे नियम बदलले, तुमच्यावर काय परिणाम होणार?
Recommended image2
EaseMyTrip ने भारतात लाँचसाठी केली पार्टनरशिप, बुकिंग होणार सोपे; वाचा संपूर्ण डिटेल्स
Recommended image3
Maruti Suzuki Victoris SUV: २७ किमी मायलेज, ३६०° कॅमेरा आणि ADAS; ग्रँड विटारालाही टाकलं मागे!
Recommended image4
Hybrid Compact SUV: लिटरला ३५ किमी मायलेज! भारतात येत आहेत ५ भन्नाट हायब्रिड कार्स
Recommended image5
Safest Hatchback Cars : कमी किंमत म्हणून दुर्लक्ष करू नका; फॅमिलीसाठी ५-स्टार सेफ्टी असलेल्या या कार्स आहेत बेस्ट!
Related Stories
Recommended image1
Upcoming Car Launches : दिवाळीत नवीन कार घेताय? बाजारात येतायत हे भन्नाट मॉडेल्स
Recommended image2
Bike Tyre Lifespan : तुमच्या बाईकचा टायर लवकर घासतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा, टेन्शन विसरा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved