Mutton Tips: मटण नेमकं कसं खरेदी करायचं? कोणता भाग कशासाठी चांगला? जाणून घेऊयात
Mutton Tips: मटणाच्या पदार्थांना चांगली चव येण्यासाठी, मांसाचा योग्य भाग निवडणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक भागाची चव आणि पोत वेगवेगळा असतो. कोणत्या कटने कोणता पदार्थ बनवायचा हे समजल्यास, भाजी, कबाब, ग्रिल सर्व काही परफेक्ट बनेल.

करी आणि स्लो-कुकिंगसाठी मटणाचे बेस्ट भाग
रान (पायाचा भाग - मागचा, पुढचा) या भागात फॅट कमी असते. मांस थोडे घट्ट असल्यामुळे हळू शिजवावे लागते. मटण करी, निहारी, कोरमा, रोस्ट यांसारख्या पदार्थांसाठी हे खूप उपयुक्त आहे.
दस्ती (खांद्याचा भाग):
हे फॅटयुक्त मांस असते. करी आणि हंडी पदार्थांसाठी हे खूप चांगले असते. रोगन जोश, मटण हंडी यांसारख्या पदार्थांसाठी हे उत्तम आहे.
ग्रिल आणि कबाबसाठी बेस्ट मटण कट्स:
पुठ (कमरेचा भाग, टेंडरलॉईन) हा मटणाचा सर्वात मऊ भाग आहे. तो लवकर शिजतो. सीक कबाब, तंदूरी मटण यांसारख्या पदार्थांसाठी याचा उपयोग होतो.
चांप (बरगड्या, चॉप्स):
यात थोडे फॅट असल्यामुळे ग्रिल केल्यावर ते खूप चविष्ट लागते. मटण चॉप्स मसाला, मुघलई चॉप यांसारख्या पदार्थांसाठी हे परफेक्ट आहे.
सूप आणि ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरले जाणारे भाग:
पाया (पायाचा शेवटचा भाग) यामध्ये कोलाजन जास्त असते. यामुळे ग्रेव्हीला चांगला घट्टपणा येतो. पाया सूप, पाया करी यांसारख्या पदार्थांसाठी हे बेस्ट आहे.
सीना (छाती, ब्रिस्केटचा भाग):
यात फॅट जास्त असल्यामुळे हे चविष्ट लागते. याला स्लो-कुकिंगची गरज असते. यखनी, काश्मिरी मटण करीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
खीमा आणि स्टफिंगसाठी योग्य मटण:
गलौटी / खीमा (बारीक केलेले मांस) हे मऊ मांस लवकर शिजते. गलौटी कबाब, मटण खीमा पाव, कटलेट्स यांसारख्या पदार्थांसाठी हे मांस बेस्ट आहे.

