जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' या आलिशान बंगल्याचे महिन्याचे वीज बिल तब्बल ७० लाख रुपये आहे.

नवी दिल्ली: अनेकांच्या मनात प्रश्न असेल की, जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' या आलिशान बंगल्याचे महिन्याचे किती असेल. तर याबाबत अनेकांना निश्चितच माहिती नसेल तेच आपण जाणून घेऊयात. 

महिन्याला ६ लाख युनिट वीज वापर

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' या आलिशान बंगल्याबाबत आपण जाणून घेऊ. हे घर २७ मजली असले तरी त्याची उंची सुमारे ६० मजली इमारतीइतकी आहे. या इमारतीत दरमहा ६ लाख युनिट विजेचा वापर होतो आणि सर्व सवलतींनंतर ७०-८० लाख रुपये शुल्क आकारले जाते, असे अहवालात म्हटले आहे.

जिम, स्पा, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मंदिर

या इमारतीत जिम, स्पा, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मंदिर, १५० हून अधिक गाड्यांसाठी पार्किंग, टेरेस गार्डन आणि ३ हेलिपॅड आहेत. बांधकामावेळी याचा अंदाजित खर्च ४५०० कोटी रुपये होता, तर सध्या त्याचे मूल्य १५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.