Lava Blaze Duo 3 With Dual Screen Launching Soon : Lava Blaze Duo 3 च्या दुसऱ्या रिअर डिस्प्लेद्वारे नोटिफिकेशन्स पाहता येतील, गाणी प्ले करता येतील, रिअर कॅमेऱ्याने सेल्फी काढता येईल आणि काही ॲप्सही वापरता येतील, अशी शक्यता आहे.
Lava Blaze Duo 3 With Dual Screen Launching Soon : लावा भारतीय बाजारपेठेसाठी एक नवीन परवडणारा स्मार्टफोन लाँच करत आहे. या फोनचे नाव Lava Blaze Duo 3 आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर कंपनीने Lava Blaze Duo 3 फोनचे डिझाइन उघड केले आहे. Lava Blaze Duo 3 हा फोन 19 जानेवारी रोजी लाँच होणार आहे.
Lava Blaze Duo 3 ची वैशिष्ट्ये
लावा हा एक भारतीय स्मार्टफोन ब्रँड आहे. त्यांचा सर्वात नवीन स्मार्टफोन मॉडेल Lava Blaze Duo 3, 19 जानेवारी रोजी भारतीय बाजारात सादर केला जाईल. फोनच्या मागील बाजूस फ्लॅट पॅनल देण्यात आले आहे. कॅमेरा मॉड्यूलजवळ आणखी एक रिअर पॅनल आहे. Lava Blaze Duo 3 च्या टीझरमध्ये यावर घड्याळासारखे डिझाइन दिल्याचे दिसत आहे. या दुसऱ्या रिअर डिस्प्लेद्वारे नोटिफिकेशन्स पाहता येतील, गाणी प्ले करता येतील, रिअर कॅमेऱ्याने सेल्फी काढता येईल आणि काही ॲप्सही चालवता येतील, अशी शक्यता आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देखील असेल. यातील किमान एक कॅमेरा 50-मेगापिक्सलचा असेल, असे म्हटले जात आहे. कॅमेरा लेन्स उभ्या मांडणीत आहेत. सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे.
Lava Blaze Duo 3: चिपसेट आणि इतर माहिती
अँड्रॉइड 15 वर आधारित असणाऱ्या Lava Blaze Duo 3 मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या स्क्रीनसाठी 1,000 निट्स पीक ब्राइटनेस अपेक्षित आहे. सेकंडरी रिअर स्क्रीनचा आकार 1.6 इंच आहे. Lava Blaze Duo 3 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 चिपसेट, 6GB रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजसह येईल. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. 5G, ब्लूटूथ 5.2, GPS, ग्लोनास, गॅलिलिओ यांसारख्या कनेक्टिव्हिटी सुविधा असलेल्या Lava Blaze Duo 3 फोनची जाडी 7.55mm आहे. फोनला IP64 रेटिंग मिळाली आहे.


